‘मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1’चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी? उत्सुकता शिगेला
Me Honar Superstar Jodi Number 1 Grand Finale : 'मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1' या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात विविध पर्फॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1'चं विजेतेपद कोण जिंकणार? वाचा सविस्तर..
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘मी होणार सुपरस्टार- जोडी नंबर 1’ या स्टार प्रवाहवरील कार्यक्रमाचा आज महाअंतिम सोहळा होणार आहे. आज आणि उद्या म्हणजेच 6 आणि 7 जुलैला या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पाहायला येणार आहे. चार जोड्या या महाअंतिम सोहळ्यात पोहोचल्या आहेत. या चार जोड्यांपैकी ही स्पर्धा कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
या चार जोड्यांमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा आणि उद्या होणार आहे. या कार्यक्रमात चार स्पर्धकांच्या जोड्या असणार आहेत. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा या चार जोड्यांमध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम 4 जोड्यांना प्रवाह परिवारातल्या 4 कलाकारांची साथ मिळणार आहे. म्हणजेच मालिकेतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ च्या महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखीच वाढणार आहे.
मालिकांमधील कलाकारांचीही हजेरी
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, लग्नाची बेडीमधील राघव, येड लागलं प्रेमाचं मालिकेतील मंजिरी आणि आई कुठे काय करते मालिकेतील संजना महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत. यासोबतच सुपरजज अंकुश चौधरी आणि समृद्धी केळकर, कॅप्टन फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेसही पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा या चार जोड्यांमधून अंतिम विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टॉप 4 जोड्यांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार अनुभवायला प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 6 आणि 7 जूनला रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचा महा विजेता कोणती जोडी होते हे पाहावं लागणार आहे.