Rang Maza Vegla | कार्तिकच्या आरोपांनंतर घर सोडण्याचा निर्णय, कठीण काळात कोण देणार दीपाची साथ?

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा (Ranga Maza Vegla) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं, पण ते तिला उपभोगता येत नाही आहे.

Rang Maza Vegla | कार्तिकच्या आरोपांनंतर घर सोडण्याचा निर्णय, कठीण काळात कोण देणार दीपाची साथ?
दीपा
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 8:49 AM

मुंबई : स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा (Ranga Maza Vegla) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं, पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं आहे. डीएनए टेस्ट कर अथवा घर सोडून जा, असे दोन पर्याय असताना स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे (Star Pravah Rang Maza Vegla serial update deepa leaves kartik house).

दीपाच्या रंगावर प्रश्न उठवले गेले पण ती शांत राहिली, तिच्या अस्तित्वावर प्रश्न उठवले गेले पण तरीही ती शांत राहिली मात्र जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय उठवला गेला तेव्हा मात्र तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचं घर सोडून ती मोठ्या आशेने माहेरी आलीय. मात्र इथेही बाबांनी तिला पुन्हा सासरी जाण्याचाच सल्ला दिला आहे. त्यामुळे या कठीण काळात दीपाला कोण साथ देणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

‘वर्ण’द्वेषाला बळी पडली दीपा!

लहानपणीच आई गमावली, त्यामुळे राधा अर्थात ‘सावत्र आई’ला आपली आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या पदरी नेहमीच उपेक्षा पडली. त्यात कृष्ण वर्णामुळे हुशार असणाऱ्या दीपाची नेहमीच जगाने थट्टा केली. मात्र, त्यानंतर तिच्या आयुष्यात कार्तिक आला आणि तिचा सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यात शक्य होत गेली.

आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे. मात्र, आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. श्वेता आणि तिच्या राधा आईच्या कटकारस्थानामुळे कार्तिकच्या मनात दीपाविषयी शंका निर्माण व्हायला लागल्या आहे. तो दीपावार संशय देखील घेऊ लागला आहे. दीपावर प्रचंड प्रेम करणारा, तिचा वर्ण न पाहता मनाची निर्मळता पाहून तिची साथ देणारा कार्तिक सध्या तिचा तिरस्कार करू लागला आहे. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे(Star Pravah Rang Maza Vegla serial update deepa leaves kartik house).

पाहा नवा प्रोमो :

(Star Pravah Rang Maza Vegla serial update deepa leaves kartik house)

पुढे काय घडणार?

आजवर इतिहासात अग्निपरीक्षा दिलेल्या असंख्य पतिव्रता आपण पाहिल्या आहेत. पण पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी या मताशी दीपा ठाम आहे. त्यामुळे दीपाचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार याची उत्सुकता असेल. लवकरच श्वेताचं कारस्थानही कार्तिकच्या समोर येणार आहे. त्यामुळे पुढे आणखी काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Star Pravah Rang Maza Vegla serial update deepa leaves kartik house)

हेही वाचा :

नगर”सेवकां”चा पगार 25 हजार, नाही हो परवडत, Fortuner चा हफ्ताच 30 हजार, आस्ताद काळेच्या कानपिचक्या

Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.