तुम्हालाही आहे ‘सुपरस्टार सिंगर’ होण्याची संधी; आताच ऑडिशन द्या…
Superstar Singer on Sony Marathi : गायक बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. सोनी मराठीवरच्या कार्यक्रमात झळकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी ऑडिशन द्यावं लागणार आहे. यात तुमची निवड झाली तर तुम्हाला टीव्हीवर दिसण्याची संधी आहे. वाचा सविस्तर...
तुमच्यातही टॅलेंट असेल तर महाराष्ट्राचा आवडता गायक होण्याची संधी तुम्हाला आहे…. कारण सोनी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. संगीताचा ‘सुरेल’ नजराणा रसिकांना देणारा ‘सुपरस्टार सिंगर’ हा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर लवकरच रंगणार आहे. सोनीच्या हिंदी वाहिनीवरील ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाच्या तीनही सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे नव्या मराठी संगीत पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आजच ऑडिशन द्या…
‘ताल, लय आणि सूर यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’ ‘सुपरस्टार सिंगर’ अशा टॅग लाईनसह आलेल्या या धमाकेदार कार्यक्रमाची आणि सदाबहार गाण्यांची सुरेल पर्वणी महाराष्ट्राच्या रसिकांना मिळणार आहे. एक नवा आश्वासक सूर शोधण्याचा प्रवास 10 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 24 ऑगस्टपर्यंत स्पर्धेच्या ऑडिशन्स सुरु राहणार आहेत. याकरीता 5 ते 30 हा वयोगट असणार आहे. या ऑडिशनमधून निवडल्या जाणाऱ्या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सूरांचं अद्वितीय पर्व. या ऑडिशन्स सोनी लिव्हवर पाठवता येतील.
View this post on Instagram
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना दिले आहेत. ‘सुपरस्टार सिंगर’ हा असाच एक नवा कार्यक्रम त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. आपल्याकडे उत्तम प्रतिभा आहे, फक्त या गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.’सुपरस्टार सिंगर’ या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने अशा गुणवान प्रतिभावंतासाठी ही संधी उपलब्ध केली आहे.
ऑडिशन कुठे देता येणार?
तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. संगीत क्षेत्रातील दिग्गज परिक्षक, अनुभवी मार्गदर्शक यांना सोबत घेऊन सुरू होणारा हा सूरमयी प्रवास कोणासोबत असणार? याची उत्सुकता अजून काही दिवस असणार आहे ‘सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. 10 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.