आम्ही एकमेकांकडे पाहायचो, मंग मी प्रपोज हाणला…; सूरज चव्हाणची ‘झापूक झुपूक’ लव्हस्टोरी
Social Media Star Suraj Chavan Lovestory : सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का? बिग बॉस मराठीच्या घरात त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. त्याने एका मुलीला प्रपोज केलं होतं, त्याची गोष्ट सूरज चव्हाणने सांगितली आहे. वाचा सविस्तर बातमी...
आधी टिक टॉक अन् मग इन्स्टाग्राम… सोशल मीडियावर एक रील शेअर केलं की लाखो व्ह्यूज मिळणारा अवलिया सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा एकतरी व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल. सध्या तो बिग बॉसच्या घरात आहे. त्याचा खेळ अन् साधेपणा प्रेक्षकांना आपलसं करतोय. बिग बॉसच्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं मात्र एका सदस्याने महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या मनावर सध्या राज्य केलं आहे, ते म्हणजे सुरज चव्हाण याने… सूरजच्या बाबत जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना आवडतं. सूरजने कधी कुणावर प्रेम केलंय का? याबाबत बिग बॉसच्या घरात तो बोलता झाला.
सूरज पडला ‘तिच्या’ प्रेमात
पॅडीने सूरज चव्हाण याला एक प्रश्न विचारला, तुला कसे माहिती की, ती तुला बघून लाइन देत होती? त्यावर सूरजने उत्तर दिलं आहे. आम्ही फक्त एकमेकांकडे पाहायचो. मग मी तिला सांगितले की, तू मला खूप आवडते. पण हा सीनमधला डायलॉग होता. मला तिला प्रपोझ हाणायचा होता. मला तिच्या हातामध्ये गुलाब द्यायचं होतं. मी तिला म्हणालो तू माझ्यसाठी लई स्पेशल आहेस. हे घे स्पेशल चॉकलेट. माझा बच्चा…, असं सूरज म्हणाला.
पॅडीने सूरजला आणखी एक प्रश्न विचारला. तू असे लाडात येऊन बोललास त्यावर तिचे काय उत्तर होतं? यावर ती म्हणाली मला दुसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चूर चूर तुकडे झाले, असं सूरजने सांगितलं. यावर तुझ्या दिलाचे किती तुकडे झाले असतील मोजता येणार नाही, अंकिता म्हणाली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
View this post on Instagram
रितेशकडून सूरजचं कौतुक
आज घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे आज भाऊचा धक्काही गणपती स्पेशल असणार आहे. आज सगळीकडे आनंदी आनंद आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने कुटुंब एकत्र येत असतं. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येतात. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आले आहेत. आजच्या भागात कॅप्टन सूरज बाप्पाचे आभार मानताना दिसणार आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख त्याला खास सल्ला देणार आहे. सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा… काम करत राहा..स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे, असं रितेश सूरजला म्हणतो.