मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडती ही मालिका आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये मुंबईमधील गोकुळधाम सोसायटी (Gokuldham Society) दाखवण्यात आलीये. या सोसायटीमधील प्रत्येक जण सोसायटीमधील सदस्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतो. दु:ख असो किंवा एखादे संकट सर्वजण मिळून त्याचा सामना करतात. इतकेच नाही तर प्रत्येक सण हे सर्वजण मिळून साजरा करतात. या सोसायटीमध्ये विविध धर्माचे लोक दाखवण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मालिकेला अनेक कलाकार सोडचिठ्ठी देऊन जाताना दिसत आहेत. चाहते सतत दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मालिकेमध्ये दयाबेन नाहीये. इतकेच नाही तर अंजली मेहता हिने देखील मालिका सोडलीये. तारक मेहता अर्थात आपल्या सर्वांचे आवडते शैलेश लोढा यांनीही मालिका सोडलीये.
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे. शैलेश लोढा आणि तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यामध्ये वाद सुरू आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडून इतके दिवस होत असताना देखील त्यांना असित मोदी यांनी पैसे दिले नाहीत. यावर काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी भाष्य केले होते.
आता हे सर्व प्रकरण थेट कोर्टामध्ये जाऊन पोहचले आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडून जवळपास एक वर्ष होत असताना देखील निर्मात्यांनी शैलेश लोढाचे पैसे दिले नाहीत. शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शैलेश लोढा यांनी त्यांचे पैसे मिळवण्यासाठी आता कायदेशीर मार्ग अवलंबला आहे.
या वादावर शैलेश लोढा यांना विचारण्यात आले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. यावर बोलताना असित मोदी म्हणाले की, शैलेश लोढा आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत, आता यावर मी काय बोलू? शैलेश लोढा यांनी कार्यालयात येऊन त्यांचे पैसे घेऊन जावे. काही कागदांवर सह्या वगैरे करणे आवश्यक आहे, ते पूर्ण झाले की, शैलेश लोढाला पैसे मिळतील.
आता या प्रकरणावर शैलेश लोढा काय भाष्य करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. असित कुमार मोदी आणि शैलेश लोढा यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. या प्रकरणात आता मे मध्ये सुनावणी केली जाणार आहे.