Tejasswi Prakash | अखेर ब्रेकअपच्या चर्चांवर तेजस्वी प्रकाश हिने सोडले माैन, थेट म्हणाली मी अंधश्रद्धाळू

| Updated on: Mar 10, 2023 | 6:12 PM

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. बिग बाॅस 15 मध्ये यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यामध्ये काही बिनसले असल्याचे चर्चा आहे.

Tejasswi Prakash | अखेर ब्रेकअपच्या चर्चांवर तेजस्वी प्रकाश हिने सोडले माैन, थेट म्हणाली मी अंधश्रद्धाळू
Follow us on

मुंबई : बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बाॅस 15 (Bigg Boss 15)  मधूनच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करण हा थेट तेजस्वी हिला गोव्याला घेऊन गेला होता. अनेकदा हे दोघे स्पाॅट होतात. इतकेच नाहीतर नागिन मालिकेच्या सेटवर करण अनेकदा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी देखील येतो. ज्याचे काही व्हिडीओ (Video) हे यापूर्वी व्हायरल झाले आहेत. करण कुंद्रा याची आई देखील तेजस्वी प्रकाशच्या घरी जाते.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले आहे. आता यावर तेजस्वी प्रकाश हिने मोठे भाष्य केले. नुकताच तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी आता रिलेशनमध्ये आहे. परंतू मी याबद्दल बोलण्याचे कायमच टाळते. मी बऱ्याच गोष्टींमध्ये अंधश्रद्धाळू आहे.

मला वाटते की, मी जेवढे माझ्या प्रेमाबद्दल बोलेल जास्त तेवढ्या लोकांच्या नजरा लागतील. त्यामुळेच कायम मी या गोष्टींवर भाष्य करणे टाळते. कारण मी यावर जेवढे जास्त बोलेल तेवढे लोक यावर लक्ष देतील, जे की मला कधीच आवडणार नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहे की, तेजस्वी प्रकाश ही लवकरच करण कुंद्रा याच्यासोबत लग्न करणार आहे.

तेजस्वी प्रकाश हिला करण कुंद्रा याच्यासोबतच्या लग्नाविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी यावर काहीच बोलणार नाहीये. पुढे तेजस्वी म्हणाली, मी लग्नाच्या विषयावर तोपर्यंत नाही बोलणार जोपर्यंत ते होणार नाही. लग्न हे माझ्या आयुष्यासाठी अत्यंत खास आणि गरजेचे आहे. परंतू यावर मी काही भाष्य करणार नाहीये.

माझे लग्न झाल्यावर मी यासर्व गोष्टींवर नक्कीच बोलेल. करण कुंद्रा याने 8 मार्च रोजी मध्यरात्री एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यानंतर तेजस्वी आणि करणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली. आता यावर तेजस्वी प्रकाश हिने स्पष्टीकरण दिले आहे. करण कुंद्रा याची पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.