मुंबई : बिग बाॅस १६ च्या फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असताना घरामध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. घरात आता फक्त सहा सदस्य शिल्लक आहे. सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडलीये. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) टीआरपीमध्ये टाॅपला राहिले आहे. नुकताच बिग बाॅसच्या घरात टाॅर्चर टास्क (Torture Task) पार पडलाय. यामध्ये शिव ठाकरे याच्या डोळ्याला मोठी दुखापत झालीये. शिव ठाकरे याला डोळा उघडणे देखील शक्य होत नाहीये. अर्चना गाैतम हिने टाॅर्चर टास्कमध्ये शिव ठाकरे, निम्रत काैर आणि एमसी स्टॅन यांच्या डोळ्यामध्ये थेट निरमा आणि हळद टाकली होती. यामुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या डोळ्याला मोठी दुखापत झालीये. शिव ठाकरे याची दुखापत पाहून साॅरी म्हणायला गेलेली अर्चना गाैतम परत भांडताना दिसली. मुळात म्हणजे अर्चना गाैतम हे बिग बाॅसच्या घरातील एक वादग्रस्त नाव आहे. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे याच्यासोबत झालेल्या भांडणांमध्ये अर्चना गाैतम हिने थेट त्याचा गळा पकडला होता.
बिग बाॅसच्या फिनालेला काही दिवस शिल्लक असतानाच बिग बाॅस १६ चा विजेता कोण होणार यावर चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांना वाटते की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी बिग बाॅसचे विजेते ठरतील.
प्रियंका चाैधरी चहर हिच्यापेक्षा शिव ठाकरे विजेता होईल, अशी एक चर्चा सातत्याने रंगत आहे. कारण काही दिवसांपूर्वी टीना दत्ता हिच्यासोबत प्रियंका चाैधरी हिने शालिन भनोट याला टार्गेट करत अत्यंत चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या.
नुकताच टीव्ही अभिनेत्री गुम है किसी के प्यार में फेम आयशा सिंह हिला बिग बाॅस १६ चा विजेता कोण होईल हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आयशा सिंह हिने शिव ठाकरे हा बिग बाॅस १६ चा विजेता होईल, असे म्हटले.
विशेष म्हणजे अनेक टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेत्यांना शिव ठाकरे हाच बिग बाॅस १६ चा विजेता होईल, असे वाटत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिव ठाकरे हा संपूर्ण शोमध्ये रिअल दिसला आहे.
मिस्टर खबरी पेजनुसार, शिव ठाकरे हा शोचा विजेता असावा…कारण तो एक मजबूत स्पर्धक आहे आणि प्रेक्षकांनाही त्याला टॉप 2 फायनलिस्टमध्ये पाहायचे आहे. सोशल मीडियावरही शिव ठाकरे याला लोक सपोर्ट करताना दिसत आहेत.