तुमच्या एक महिन्याच्या पगारापेक्षा जास्त आहे एमसी स्टॅनची एक रील तयार करण्याची शुल्क
एमसी स्टॅन एका दिवसात लाखो रुपये कमाई करतो. स्टॅनचा एका ब्राँडसोबत एका दिवसाचा कमीटमेंट ८ ते १० लाख रुपये आहे. इतकंच नाही तर एमसी स्टॅन एक रील तयार करण्यासाठी १८ ते २३ लाख रुपये कमावतो.
बिग बॉस १६ चे विजेता राहिलेला एमसी स्टॅन आता मोठा सुपरस्टार झालाय. एमसी स्टॅनचे सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. स्टॅन एक रील तयार करण्यासाठी कित्तेक लाख रुपये शुल्क घेतो. किमत जाणून तुम्हीही हैराण व्हालं. रिअॅलिटी शो बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅनने सोशल मीडियावर चांगलीच छाप सोडली. बहुतेकजण स्टॅनच्या स्टाईलचे चाहते झालेत. आता तो देशातील वेगवेगळ्या शहरात लाईव्ह परफार्म करणार आहे. एमसी स्टॅनने इंस्टावर लाईव्ह येऊन इतिहास रचला. स्टॅनच्या या लाईव्हने शाहरुख खानला मागे टाकलं. दहा मिनिटांत स्टॅनचे लाईव्ह व्युज 541K पर्यंत पोहचले. त्यात एमसी स्टॅन एक रील तयार करण्यासाठी लाखो रुपये शुल्क घेतो. तुमच्या पगाराच्या कित्तेक पट रक्कम तो रील तयार करण्यासाठी घेतो. बिग बॉसचा विजेता झाल्याने त्याच्या शुल्कात ३० ते ४० टक्के वाढ झाली.
एक रील तयार करण्यासाठी १८ ते २३ लाख
मीडिया रिपोर्टनुसार, एमसी स्टॅन एका दिवसात लाखो रुपये कमाई करतो. स्टॅनचा एका ब्राँडसोबत एका दिवसाचा कमीटमेंट ८ ते १० लाख रुपये आहे. इतकंच नाही तर एमसी स्टॅन एक रील तयार करण्यासाठी १८ ते २३ लाख रुपये कमावतो. तसेच एक इंस्टा स्टोरी बनवण्यासाठी ५ ते ७ लाख रुपये शुल्क घेतो. विशेष म्हणजे ही शुल्क बिग बॉस विजेता होण्यापूर्वीची आहे. आता त्याच्या शुल्कात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.
२० पेक्षा जास्त बान्डसोबत कान्टॅक्ट
बिग बॉसमधून विजेता म्हणून निघाल्यानंतर एससी स्टॅन मोठा स्टार झालाय. त्याच्या फॉलोअर्सची संख्या लक्षात घेता मोठ-मोठे बान्ड्स त्याच्याशी कान्टॅक्ट करताहेत. अमेझान मिनी टीव्हीसोबत त्याने डील केली आहे. स्टॅनचे मॅनेजर जास्त बान्ड्ससोबत कान्टॅक्ट करण्यासाठी करार करत आहेत. फॅशन, एक्सेसरी, गेमिंग, ई-स्पोर्ट्स आणि म्युझिक बान्ड्स त्याच्याशी संपर्क करत आहेत.
देशभर होणारा लाईव्ह परफार्मन्स
बिग बॉस १६ चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन देशभरातील शहरांमध्ये लाईव्ह परफार्मन्स करणार आहे. काही शहरात शोची तिकीट अॅडव्हान्स बूक करण्यात आल्यात. ५ मार्चला मुंबईत, १० मार्चला हैदराबाद, ११ मार्चला बेंगळुरुत, १७ मार्चला इंदौर, १८ मार्चला नागपूर, २८ एप्रिलला अहमदाबाद, २९ एप्रिलला जयपूर, ६ मे रोजी कोलकाता आणि ७ मे रोजी दिल्लीत एमसी स्टॅनचे लाईव्ह परफार्मन्स होणार आहेत.