अमिताभ बच्चन घरातून पळून आले असे वाटल्याने दिग्दर्शकाने केला होता थेट वडिलांना फोन! वाचा किस्सा
सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती 13' (KBC 13) या क्विझ शोच्या सोमवारच्या भागाची सुरुवात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भगवान गणेशाचे नाव घेऊन केली. जेव्हा शो सुरू झाला, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या समोर बसलेल्या स्पर्धक डॉ. संचाली चक्रवर्ती यांना एक प्रश्न विचारला, जो त्यांच्या पहिल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाशी संबंधित होता.
मुंबई : सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ (KBC 13) या क्विझ शोच्या सोमवारच्या भागाची सुरुवात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भगवान गणेशाचे नाव घेऊन केली. जेव्हा शो सुरू झाला, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या समोर बसलेल्या स्पर्धक डॉ. संचाली चक्रवर्ती यांना एक प्रश्न विचारला, जो त्यांच्या पहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाशी संबंधित होता.
आपल्या चित्रपटाशी सबंधित हा प्रश्न येताच अमिताभ यांना त्यांचे जुने दिवस आठवले. या दरम्यान, त्यांनी आपल्या दिग्दर्शकाला ते घरातून पळून गेले आहेत असे वाटले आणि त्याने थेट आपल्या पालकांना फोन केला, याबद्दलचा एक किस्साही सांगितला.
‘बिग बीं’च्या चित्रपटाशी संबंधित प्रश्न
संचलीला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, सात हिंदुस्तानी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कोण होते? त्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत आणि त्यांनी तज्ज्ञांची मदत घेतली. तज्ज्ञांनी त्यांना बरोबर उत्तर सांगितले, जे होते-ख्वाजा अहमद अब्बास. यानंतर, अमिताभ यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक अब्बास त्यांची ऑडिशन घेत होते. त्यांनी अमिताभ यांना त्यांचे नाव विचारले. अमिताभ यांचे आडनाव ऐकल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले. अमिताभ, मी हरिवंश हा राय बच्चनचा मुलगा आहे, असे म्हणताच दिग्दर्शकाने त्यांना लगेच बोलावले.
जेव्हा दिग्दर्शक अमिताभच्या वडिलांना फोन करतात…
यावेळी दिग्दर्शक अब्बास यांना वाटले की, अमिताभ बच्चन अभिनेता होण्यासाठी घरातून पळून आले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांनी अमिताभ यांना ऑडिशन हॉलमध्ये थांबण्यास सांगितले आणि ते अमिताभ यांच्या वडिलांना फोन करायला गेले. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांना फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा लुक टेस्टसाठी इथे आला आहे. फोन केल्यावर दिग्दर्शकाची खात्री पटली आणि त्यांना कळले की, अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन यांना माहित होते की त्यांचा मुलगा ऑडिशनसाठी गेला आहे.
अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट
अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1969मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून केली. या चित्रपटातील मल्टीस्टारर कलाकारांपैकी ते एक गोटे. मात्र, त्यांना या चित्रपटातून कोणतीही विशेष ओळख मिळू शकली नाही. अमिताभ यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात 1973 मध्ये ‘जंजीर’ या चित्रपटाने झाली. या चित्रपटातून अमिताभ ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले गेले. या चित्रपटाने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले, जिथून सुरु झालेली अमिताभ यांची कारकीर्द आजही सुरू आहे आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा :
समंथाची पती नागा चैतन्यच्या पोस्टवर खास कमेंट, घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न?