Devmanus : ‘ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांना…’, ‘देवमाणूस’ मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देवची खास पोस्ट

| Updated on: Aug 24, 2021 | 8:36 AM

सर्वत्र मालिकेची चर्चा असताना आता डॉक्टर अजित कुमार देव अर्थात किरण गायकवाडची खास पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  या पोस्टमध्ये त्यानं मालिका आणि त्याच्या पात्राविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे. ('Those who don't like my work ...', Special post by Dr. Ajit Kumar Dev from 'Devmanus' serial)

Devmanus : ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांना..., देवमाणूस मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देवची खास पोस्ट
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही. उलट शेवट दाखवलेल्या कथानकामुळे आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात आहे.

किरण गायकवाडनं शेअर केली खास पोस्ट

सर्वत्र मालिकेची चर्चा असताना आता देवीसिंग अर्थात किरण गायकवाडची खास पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  या पोस्टमध्ये त्यानं मालिका आणि त्याच्या पात्राविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यानं लिहिलं, ‘मी खुप दिवस झाले हा विचार करतोय कि post लिहावी पण शब्द नव्हते … आज लिहुनच टाकल देवमाणूस सीरियल बघता बघता संपली ….. खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादांपर्यंत सगळ्यांनी हातभार लावला …. देवमाणूसच्या सेटवरचा प्रत्येक माणुस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणाऱ्या आजवरच्या मालिकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसूने मोडले.’

त्यानं पुढे लिहिलं, ‘टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे आणि मोठे रात्री जागून न चुकता देवमाणूस बघु लागले होते. “या डॉक्टर ला लई हानला पाहेन “
‘हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो’ ‘हा डॉक्टर ह्यच्यातर @&₹£^%# (अपशब्द)’ ‘खुप सारे meme तयार झाले memers ला पण सलाम यार’.. आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कमाची पावती, हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती..पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातुन दूर झाल्या.’

पाहा पोस्ट

सध्या ही पोस्ट चाहत्यांचं मन जिंकून घेत आहे. या पोस्ट सोबतच किरणनं अनेक फोटोसुद्धा शेअर केले आहेत. अशातच आता ‘देवमाणूस’ मालिकेच्या दुसऱ्या भागाची चर्चा होतेय त्यामुळे याचा दुसरा भाग कधी येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या

Saira Banu Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात, अखेरपर्यंत साथ, सायरा बानो यांचे खास किस्से

‘जग बदल घालूनी घाव…’ हे लोकप्रिय गाणं अण्णा भाऊ साठेंना कुठे सूचलं?; हृदयनाथ सिन्नरकरांनी सांगितलेला किस्सा वाचा!

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’