‘अनुपमा’ला मोठा धक्का, ‘गुम है किसी के प्यार में’ टीआरपीमध्ये अव्वल

| Updated on: Nov 17, 2022 | 10:46 PM

बऱ्याच वेळेला तिची मुले देखील तिच्या निर्णयात सहभागी नसताना ती कशी यशस्वी होते, हे सर्व काही अनुपमा मालिकेत दाखवण्यात येते.

अनुपमाला मोठा धक्का, गुम है किसी के प्यार में टीआरपीमध्ये अव्वल
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका अनुपमा ही टीआरपीमध्ये टाॅपला होती. अनुपमा मालिकेत निर्माते सतत काही गोष्टी बदलत राहतात. इतकेच नाही तर एक सर्वसामान्य महिला जिचे आयुष्य फक्त कुटुंबाभोवती फरत असताना आयुष्यामध्ये असे काही तरी अचानक घडते की, पुढे ती स्वत: च्या पायावर कशाप्रकारे उभी राहते आणि समाजाचा विचार न करता जीवनामध्ये अत्यंत मोठे निर्णय घेते. विशेष म्हणजे तिच्या या निर्णयामध्ये सर्वांचाविरोध देखील होतो. बऱ्याच वेळेला तिची मुले देखील तिच्या निर्णयात सहभागी नसताना ती कशी यशस्वी होते, हे सर्व काही अनुपमा मालिकेत दाखवण्यात येते.

अनुपमा ही मालिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच आवडते. मात्र, या आठवड्यात अनुपमा मालिकेला टीआरपीमध्ये मोठा धक्का बसला आहे. स्टार प्लसची प्रसिध्द मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ ने अनुपमाला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुम है किसी के प्यार में मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर मालिकेची मुख्य अभिनेत्री सई परत एकदा विराटच्या जवळ आली असून सई आणि विराटची एक मुलगी आहे, हे पहिल्यांदाच विराटला कळाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

सईने अनेक वर्ष विराटपासून दूर राहत विराटला हे कळू दिले नव्हते की तिची आणि विराटची एक मुलगी आहे. आता विराटच्या आयुष्यात सई आणि त्यांची मुलगी परत आलीये. मात्र, सई विराटला सोडून गेल्यावर कुटुंबाच्या दबावामुळे विराटने पाखीसोबत लग्न केले.

पाखी आणि विराटच्या लग्नाला अनेक वर्ष होऊनही विराटने पत्नी म्हणून पाखीचा स्विकार अजूनही केला नाहीये. त्यामध्येच आता सई आणि विराटची मुलगी परत एकदा विराटच्या आयुष्यात आल्यामुळे मालिका वेगळ्या वळणावर पोहचलीये. आता पाखी पुढे काय करणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

इकडे अनुपमामध्ये देखील अनुपमाने तिच्या मुलीला घराच्या बाहेर काढून दिले आहे. लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये अनुपमाला तिच्या मुलीची सच्चाई कळते, त्यानंतर अनुपमा तिला घराच्या बाहेर काढते. आता अनुपमा मालिकेमध्ये टीआरपी वाढवण्यासाठी काय खास केले जाते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.