अक्षरा-अधिपतीमधल्या नात्याला येतोय बहर; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका नव्या वळणावर
Tula Shikvin Changalach Dhada Serial : झी मराठीवरची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेत आता नवा ट्रॅक पाहायला मिळत आहे. मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांच्यातील नातं आता अधिक घट्ट होत आहे. वाचा सविस्तर...
मराठी मालिकांचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी मालिका, त्यातील पात्र प्रेक्षकांना जवळची वाटतात. या मालिकांमधील घटना प्रेक्षकांना आपल्या घरात घडत असल्यासारखं वाटतं. प्रेक्षक या मालिकांमध्ये गुंतलेले असतात. झी मराठीवरची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकाही प्रेक्षकांना आवडते आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांचं नातं प्रेक्षकांना भावतं. आता ही मालिका एका नव्या वळणावर आली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचं नातं बहरताना दिसत आहे. या दोघांमधली मैत्री आता हळूहळू घट्ट होत चालली आहे.
अक्षराने दिली प्रेमाची कबुली
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे. काहीच दिवसांआधी अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. त्यामुळे अक्षरा आणि अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. या दोघाच्या मैत्रीला आता प्रेमाचा बहर आला आहे. अक्षराने अधिपतीला आपल्याला त्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं आहे. पैशांपेक्षा तू कमावलेली नाती ही अधिक मौल्यवान असल्याचं अक्षराने अधिपतीला सांगितलं आहे. त्यामुळे आता या दोघांचं नातं कसं पुढे जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
View this post on Instagram
‘नवरा हाच हवा’ गाण्याची क्रेझ
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत वटपौर्णिमेचा सिक्वेन्स दाखवण्यात आला आहे. अक्षरा आणि अधिपतीवर चित्रित ‘नवरा हाच हवा’ हे वटपौर्णिमा विशेष गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. फक्त 2 दिवसात ह्या गाण्याने इंस्टाग्रामवर एक मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेलं हे गाणं सध्या ट्रेंडिंग होत आहे आणि ह्या गाण्यावर रील्स सुद्धा बनत आहेत. या गाण्यात अक्षरा आणि अधिपतीच्या केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘प्रफुल – स्वप्नील’ हे ह्या गाण्याचे संगीतकार आहेत. ह्या गणायचे बोल ‘मंदार चोळकर’ यांचे आहेत. ‘वेदा नेरुरकरने’ आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. ह्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे ‘अमित बैंग’ ह्यांनी. तर संकलन ‘विनायक पवार’, साऊंड आईडियास स्टुडिओ यांचं आहे.