मुंबई : उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. उर्फीने तिच्या हटके कपड्यांमुळे अगदी कमी वेळामध्ये एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे. बिग बाॅस ओटीटीमुळे खरी ओळख उर्फी जावेद हिला मिळालीये. उर्फीने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका देखील केल्या आहेत. हटके कपडे घालून उर्फी जावेद अनेकदा स्पाॅट होते. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल देखील व्हावे लागते.
विशेष म्हणजे उर्फी जावेद हिला कोणी तिच्या कपड्यांवरून ट्रोल करत असेल तर उर्फी त्यांचा चांगलाच समाचार घेते. उर्फी कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता उर्फी जावेद हिने चक्क भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत पंगा घेतला आहे.
चित्रा वाघ यांनी थेट पोलिस ठाण्यात उर्फी जावेद हिच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर निशाना साधला होता. उर्फीने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
नुकताच उर्फी जावेद ही मुंबई विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळी देखील उर्फी अतरंगी स्टाईलमध्ये दिसून आली. यावेळी कॅमेरामॅन उर्फीला म्हणाले की, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय संदेश देऊ इच्छिता…
उर्फी म्हणाली की, प्रेमाचे तर माहिती नाहीये… पण माझा नंगा नाच असाच सुरू राहणार आहे, असे उर्फी जावेद हिने म्हटले आहे. आता उर्फीचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. उर्फीला नेमका कोणाला इशारा द्यायचा होता, हे सर्वांच्या लक्षात आले.