त्याला गेम कळत नाही पण…; मराठी कलाकारांचा सूरज चव्हाणला सपोर्ट
Marathi Actor actress on Suraj Chavan and Bigg Boss : बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची महाराष्ट्रभर चर्चा होत असते. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्या जातात. सूरज चव्हाण याच्यासाठी मराठी कलाकारांनी आवाज उठवला आहे. वाचा...
सूरज चव्हाण… अतिशय सामान्य घरातील मुलगा. त्याच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आला. त्याचे इन्स्टाग्रामवरील रील्स प्रचंड व्हायरल झाले. सोशल मीडियावर वापरणाऱ्यांनी सूरज चव्हाणचा एकतरी व्हीडिओ पाहिलाच असेल. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बग बॉसच्या घरात आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला प्रचंड सपोर्ट केला आहे. शिवाय मराठी कलाकारांनीही त्याला सपोर्ट केलाय. बिग बॉसच्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनी सूरजला पाठिंबा दिला आहे. अभिनेता- गायक उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग यांच्या शिवाय इतर कलाकारांनी सूरजला सपोर्ट केलाय.
उत्कर्ष शिंदेने विचारला ‘तो’ सवाल
मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप मतदान द्या. मला खूप राग येतो. कारण सारखं कुणीतरी त्याला हिणवत असतं. कुणीतरी कमी लेखत असतं. घरातील कामांमध्ये पण त्याच्यावर अन्याय होतो. दोन- दोन वेळेला तो भांडी घासत असतो. पण त्याला भांडी का नेहमी घासायला लावतात. तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो. त्यालाच का बूट उचलायला लावता? का?, असा सवाल उत्कर्ष शिंदे याने उपस्थित केला.
“महेश सर होस्ट असते तर…”
बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावलं होतं आणि त्याला सांगितलं की खेळ म्हणून… ते मला खूप आवडलं. एक व्हीडिओ मी आता पाहिला त्यात जान्हवी सूरजला म्हणत होती की किती फालतू आहे हा… सर्रास आपण लोकांना फालतू म्हणतो, पण ते योग्य नाही. जर उलट झालं असतं की, सूरज जान्हवीला फालतू म्हणाला असता तर तुम्हाला चालेल का?, असं उत्कर्ष म्हणाला. महेश मांजरेकर जर होस्ट असते तर त्यांनी निक्की तांबोळीचा क्लास घेतला असता. जान्हवीचा क्लासही त्यांनी घेतला असता. आमच्यासाठी बिग बॉस म्हणजे महेश सर… पण रितेश देशमुखही चांगलं होस्ट करत आहेत, असंही उत्कर्ष शिंदे म्हणाला.
View this post on Instagram
सूरज चव्हाण फार साधा माणूस आहे. त्याला गेम कळत नाही पण पण तो खरा आहे. त्याला माझा पाठिंबा आहे, असं बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक पुष्कर जोग म्हणाला. सूरज तुला फुल्ल सपोर्ट आहे, असं म्हणत अभिनेत्री साक्षी गांधी हिने सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे.