Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yeu Kashi Tashi mi Nandayla | मालिकांच्या विश्वात नेमकं चाललंय तरी का?, ‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षक संतापले!

सध्या मालिका विश्वात महिला सबलीकरण आणि महिलाशक्ती या विषयांवर अगदी भरभरून बोललं जात आहे. मात्र, याच वेळी दुसऱ्या ठिकाणी पुरुषांच्या बाबतीत गप्प का?, असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला आहे.

Yeu Kashi Tashi mi Nandayla | मालिकांच्या विश्वात नेमकं चाललंय तरी का?, ‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षक संतापले!
येऊ कशी तशी मी नांदायला
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 10:43 AM

मुंबई : सध्या मालिका विश्वात महिला सबलीकरण आणि महिलाशक्ती या विषयांवर अगदी भरभरून बोललं जात आहे. मात्र, याच वेळी दुसऱ्या ठिकाणी पुरुषांच्या बाबतीत गप्प का?, असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला आहे. प्रेक्षकांच्या या रोषाचं कारण ठरलंय ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतील एक दृश्य. वास्तविक नव्यानंच सुरु झालेली ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, मालिकेतील त्या एका दृश्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहे (Yeu Kashi Tashi mi Nandayla Malvika Gives punishment to rocky viewers angry on this seen).

गर्भ श्रीमंत ‘ओमकार’ आणि गरीब घरातील ‘स्वीटू’ यांच्या मैत्री आणि प्रेमकथेवर आधारित या मालिकेचं कथानक आहे. यातील ‘स्वीटू’, ‘ओमकार’, ‘मालविका’, ‘रॉकी’, ‘नलू’, ‘मिसेस खानविलकर’ ही मुख्य पात्र रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडत आहेत.

काय आहे ‘या’ दृश्यात?

खानविलकरांच्या घरातील मोठी लेक अर्थात ‘मालविका’ या पात्राला आपल्या श्रीमंतीचा प्रचंड गर्व आहे. आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या व्यक्तीला तुच्छ मानणाऱ्या या मालविकाने घरातील सदस्य असणाऱ्या ‘रॉकी’ला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली आहे. मालिकेत या पात्राचा ‘राग’ दाखवण्यासाठी चक्क दुसऱ्या एका पात्राला पशुंसारखी वागणूक देण्यात आली आहे. मालविकाचं काम न करू शकलेल्या रॉकीच्या गळ्यात तिनं थेट कुत्र्याचा पट्टा घालून त्याला कुत्र्याप्रमाणे वागण्याची शिक्षा दिली होती.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागातील ‘या’ दृश्यावर प्रेक्षक कमालीचे नाराज झाले आहेत. ‘चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणात पशु पक्षांना इजा झालेली चालत नाही. माणसाचा पशु झालेला चालतो का?’ असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोध करत असताना, एखाद्या पुरुषाच्या बाबतीत असं वागणं किंवा असं दृश्य चित्रित करून ते टीव्हीवर दाखवणं कितपत योग्य आहे?, असा प्रश्न देखील रसिक प्रेक्षकांकडून विचारला जात आहे (Yeu Kashi Tashi mi Nandayla Malvika Gives punishment to rocky viewers angry on this seen).

असे होते ‘ते’ दृश्य

Seen

असे होते ‘ते’ दृश्य

मालिकेची कथा

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे, तर या नात्यात दोन कुटुंब जोडली जातात.आपलं माहेर, हक्काची माणसं सोडून मुलगी नव्या घरात जाते आणि तिथल्या माणसांना आपलसं करते. प्रत्येक गोष्ट शेअर करायला नवरा जरी सोबत असला तरीदेखील अनेकदा मुलींना त्यांच्या मैत्रिणींची उणीव भासत असते. परंतु, जर अशावेळी सासूचं मुलीची मैत्रीण झाली तर? खरं तर सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.

(Yeu Kashi Tashi mi Nandayla Malvika Gives punishment to rocky viewers angry on this seen)

हेही वाचा :

Video | ‘पाहिले न मी तुला’ शीर्षकगीताला नेटकऱ्यांची पसंती, पाहा कसे तयार झाले ‘हे’ गाणे!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.