मुंबई : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) याची पहिली पत्नी पायल मलिक (Payal Malik) हिने नुकताच दोन गोंडस बाळांना जन्म दिलाय. एक मुलगा आणि एक मुलगी ही पायल मलिक हिला झालीये. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक (Kritika Malik) हिने देखील काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिलाय. या मुलाचे नाव जैद असे ठेवले आहे. पायल हिने दोन जुळ्या लेकऱ्यांना जन्म दिलाय. नुकताच पायल आणि अरमान मलिक यांनी ब्लाॅगमध्ये त्यांच्या मुलांची झलक ही प्रेक्षकांनी दाखवलीये. दोन दिवसांपूर्वीच पायलचे आणि दोन नव्या पाहुण्यांचे घरात जोरदार स्वागत हे करण्यात आले होते.
संपूर्ण मलिक कुटुंब बाळांच्या आगमनामुळे अत्यंत आनंदी झाले होते. मात्र, पायल हिची तब्येत खराब होताना दिसत दिसत होती डाॅक्टर घरी येऊन पायल हिच्यावर उपचार करताना दिसत आहेत. मात्र, आता अजून एक वाईट बातमी पुढे येतंय. लेटेस्ट ब्लाॅगमध्ये अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल ही रडताना दिसत आहे.
26 एप्रिल रोजी पायल हिने जुळ्या लेकऱ्यांना जन्म दिलाय. त्यांनी मुलीचे नाव तुबा आणि मुलाचे नाव अयान असे ठेवले आहे. नुकताच लेटेस्ट ब्लाॅगमध्ये सांगितले की, त्यांच्या बाळाला पीलिया झाला आहे. यामुळेच पायल मलिक ही ढसाढसा रडताना दिसत आहे. ब्लाॅगमध्ये अरमान मलिक हा पायल हिला हिंमत देताना दिसत आहे.
पायल आणि अरमान यांच्या मुलाचे वजन खूप कमी आहे आणि त्यामध्ये आता त्याला पिलिया झाला आहे. ब्लाॅगमध्ये पायल हिला रडताना पाहून चाहतेही टेन्शनमध्ये आले आहेत. अनेकांनी कमेंट करत यांना अनेक सल्ले दिल्याचे दिसत आहेत. सर्वकाही ठिक होईल असेही म्हणताना अनेकजण हे दिसत आहेत. आता अरमान मलिक हा चार मुलांचा बाप झालाय.
अगदी कमी वेळामध्ये अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे यांच्या ब्लाॅगला चाहत्यांचे खूप जास्त प्रेम मिळते. यांनी अनेक म्यूझिक व्हिडीओ देखील तयार केले आहेत. अरमान मलिक याने दोन लग्न केले असून पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक असून हे सर्वजण चंदीगढमध्ये राहतात.