Devmanus | देवीसिंगने घेतलीय अजित कुमार देवची जागा, आर्या-दिव्याला चकवत तुरुंगातून सुटणार की त्याचाच गेम होणार?

| Updated on: Jul 08, 2021 | 9:07 AM

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सुरु झाली आहे.

Devmanus | देवीसिंगने घेतलीय अजित कुमार देवची जागा, आर्या-दिव्याला चकवत तुरुंगातून सुटणार की त्याचाच गेम होणार?
देवमाणूस
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सुरु झाली आहे. तुरुंगात असूनही या ‘देवमाणसा’चे कारनामे अद्याप सुरुच आहेत(Zee Marathi Devmanus serial update Vijay will attack on Devising).

डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग आहे हे पटवून देण्यासाठी तो कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या मुंबईतील डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर केले गेले होते. मात्र, या दरम्यान देखील त्याने अनेक उलट प्रश्नांचा भडीमार करत त्या डॉक्टरांची साक्ष पिटाळून लावली. मात्र, तोच देवीसिंग नसल्याचे त्याचे म्हणणे खरे करण्यासाठी तो नवनवीन क्लृप्त्या काढत आहे. आता त्याने आपल्या जुळ्या भावाचे अर्थात खऱ्या डॉ. अजितकुमार देव याची कागदपत्र सादर करून आपणच डॉक्टर असल्याचे सिद्ध केले आहे.

दिव्याच्या अनुपस्थितीत केस फिरणार?

सध्या कोर्टात देवीसिंगची केस सुरु आहे. या दरम्यान काही दिवसांपासून एसीपी दिव्या सिंह कोर्टातूनच नव्हे तर गावातूनच गायब असल्याचे दाखवले गेले आहे. दरम्यान, दिव्या नसताना आर्या आणि इन्स्पेक्टर शिंदे ही केस सर्वोतोपरी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान देवीसिंगने डिंपलकरवी आपल्या भावाचे म्हणजेच डॉ. अजित कुमार देव याची खरीखुरी कागदपत्रे सादर करून आपणच डॉक्टर असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे आता आर्या आणि दिव्याला चकवत देवीसिंग तुरुंगातून निसटणार असल्याचे चित्र दिसत आहे.

देविसिंगचा खून होणार?

मालिकेच्या नव्या प्रोमोत रेश्माचा नवरा विजय हा रागाने देवीसिंगच्या पोटात कैची मारताना दिसतो आहे. आपल्या पत्नीला देवीसिंगनेच मारल्याचा संशय विजय आला असल्याने, चिडलेल्या विजयने बदल घेण्याच्या उद्देशाने डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंगवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात देवीसिंग बचावेल की त्याचा खरोखर जीव जाईल, याबद्दल प्रेक्षकांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवीसिंगला जुळा भाऊ?

मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली असतानाच यात आणखी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मालिकेत दोन अजित कुमार देव दाखवण्यात आले आहेत. अर्थात यातील एक देवीसिंग आहे, तर दुसरा डॉ. अजित कुमार देव. हे दोघेही एकमेकांचे जुळे भाऊ असल्याचे म्हटले गेले आहे. डॉ. अजित कुमार देव या संभाषणादरम्यान आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूचा दोष आपल्या जुळ्या भावलं अर्थात देवीसिंगला देताना दिसतो. मात्र, यावेळी देवीसिंग आपल्या डॉक्टर भावाचा खून करताना दाखवला आहे. तर दुसरीकडे डॉ. अजितकुमार देव आपला भाऊ असल्याचे देविसिंग डिंपलला सांगताना दाखवलं आहे. त्यामुळे आता खरंच देवीसिंगला भाऊ होता का? आणि त्याचा खून करून देवीसिंग डॉ. अजितकुमार देव बनलाय? की या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासती तो पुन्हा एकदा केवळ थापा मारतोय, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

(Zee Marathi Devmanus serial update Vijay will attack on Devising)

हेही वाचा :

PHOTO | ‘अरुंधती’ नव्हे ‘अनुपमा’, ‘अनिरुद्ध’ नव्हे ‘वनराज’, जेव्हा ‘आई कुठे काय करते’ आणि ‘अनुपमा’ एकत्र येतात!

Devmanus | कोरोना, लॉकडाऊन, चित्रीकरण अन् कोर्टातच झालं ‘डिंपल’च्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन!