हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल?

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा रिलीज झालाय. महाराष्ट्रात आज ‘ठाकरे फिव्हर’ आहे. हा सिनेमा हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज झालाय. पण नेमका कोणत्या भाषेतला सिनेमा पाहावा, असा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. सिनेमाचं तिकीट बूक करताना गोंधळ उडाला असेल तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बाळासाहेबांचा आवाज ही एक त्यांची […]

हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा रिलीज झालाय. महाराष्ट्रात आज ‘ठाकरे फिव्हर’ आहे. हा सिनेमा हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज झालाय. पण नेमका कोणत्या भाषेतला सिनेमा पाहावा, असा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. सिनेमाचं तिकीट बूक करताना गोंधळ उडाला असेल तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

बाळासाहेबांचा आवाज ही एक त्यांची ओळख होती. हा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर मराठी सिनेमा पाहा. आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांच्या आवाजात हा सिनेमा डब करण्यात आलाय. चेतन सशीतल यांनी हुबेहूब बाळासाहेबांच्या आवाजाला न्याय दिलाय. त्यामुळे बाळासाहेबांना पाहिल्याचं फिल येतं.

नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणेच त्याच्या अभिनयाने मन जिंकलंय. या सिनेमातही नवाजचा अभिनय लाजवाब झालाय. या अभिनयासोबतच त्याच्या नैसर्गिक आवाजाचेही तुम्ही चाहते असाल तर हिंदी सिनेमा पाहा. हिंदी सिनेमात काही राष्ट्रीय मुद्दे दाखवण्यात आले आहेत, जे मराठी सिनेमात पाहायला मिळणार नाहीत. वाचाREVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आवाजावरुन चाहते निराश झाले होते. त्यानंतर निर्मात्यांनी तातडीने चाहत्यांची भावना लक्षात घेतली आणि आवाजचं डबिंग सुरु केलं. हिंदी सिनेमातला आवाज डब केलेला नसला तरी मराठी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे एक ट्रीट आहे. ज्यांना बाळासाहेब जवळून पाहिलेले नाहीत, त्यांना मराठी सिनेमा पाहून बाळासाहेब समजतात.

बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते तिथून या चित्रपटाला सुरुवात होते.. मुंबईत मराठी माणसाला काडीची किंमत दिली जात नाही. परप्रांतीयांची मुंबईतील आवक वाढत चाललीये..त्यामुळे परप्रांतीयांना पुन्हा माघारी धाडून मराठी माणसाला रोजगार मिळावून द्यायचाच या जिद्दीने पेटून उठलेल्या बाळ ठाकरेचा बाळासाहेब ठाकरे कसा बनतो या प्रेरणादायी प्रवास ठाकरे या चित्रपटात दाखवण्यात आलाय..

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.