Chali Chali Full Song Out : दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ समांथा अक्कीनेनीच्या हस्ते ‘थलायवी’चे पहिले गाणे प्रदर्शित!
चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या ‘थलायवी’ या चित्रपटातील ‘चली चली’ हे पहिले गाणे आज (2 एप्रिल) प्रदर्शित करण्यात आले आहे. दक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ समांथा अक्कीनेनीच्या हस्ते हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आणि कंगनाचे चाहते देखील तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या ‘थलायवी’ या चित्रपटातील ‘चली चली’ हे पहिले गाणे आज (2 एप्रिल) प्रदर्शित करण्यात आले आहे. दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ समांथा अक्कीनेनीच्या हस्ते हे गाणे प्रदर्शित करण्यात आले (Thalaivi song kangna ranaut starrer thalaivi Chali Chali Full Song Out).
कंगनाच्या ‘थलायवी’चे हे पहिले गाणे हिंदी, तमिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेत्री समांथा अक्कीनेनी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे प्रदर्शित करताना तिने खास पोस्टही लिहिली आहे. ती म्हणाली, ‘अम्माची अतुलनीय कृपा आणि पडद्यावर तिची आश्चर्यकारक उपस्थिती याची सर्वांना माहिती आहे. सिनेमा ते सीएमपर्यंतच्या अनोख्या प्रवासाचा साक्षीदार. #chalichali #MazhaiMazhai #IlaaIlaa’ पुढे ती लिहिते, ‘चित्रपटाची टीम रिलीज करीत असलेली प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते आहे. देवाचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहे.’
समांथाचे ट्विट
Amma’s unmatched grace and her stunning screen presence is known to all. Witness her fanfare from Cinema to CM. #ChaliChali #MazhaiMazhai #IlaaIlaa out!
Hindi: https://t.co/H5hU3WaYR5 Tamil: https://t.co/JprUWiDKHS Telugu: https://t.co/GvVn7LGIsW@KanganaTeam @thearvindswami
— Samantha Akkineni (@Samanthaprabhu2) April 2, 2021
(Thalaivi song kangna ranaut starrer thalaivi Chali Chali Full Song Out)
पाहा ‘थलायवी’चे पहिले गाणे :
जयललिता यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची अभिनयातील कारकीर्द कंगनाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘थलायवी’चे हे गाणे अतिशय सुंदरपणे रेखाटले आहे. या गाण्यात कंगना पाण्यात खेळताना दिसत आहे. जयललिता यांच्या या शास्त्रीय जगाला एका स्टुडिओचे रूप देऊन चित्रीकरण केले गेले आहे. ज्यातील प्रत्येक देखावा जयललिता यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कहाणी वर्णन करतो (Thalaivi song kangna ranaut starrer thalaivi Chali Chali Full Song Out).
या गाण्याला जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी सुमधुर संगीत दिले आहे आणि सैंधवी यांनी आवाज दिला आहे. गीत इरशाद कामिल यांनी लिहिले आहे. हे गाणे जयललिता यांच्या 1965मध्ये आलेल्या पहिल्या चित्रपटातील अर्थात ‘वेणीरा अड़ाई’ या चित्रपटाची आठवण करून देणारे आहे. ‘थलायवी’ हा चित्रपट दिग्गज अभिनेत्री आणि नंतर राजकारणी बनलेल्या जयललिता यांच्या जीवन कथेवर आधारित आहे.
‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत
‘थलायवी’ या चित्रपटासाठी कंगनाने अथक मेहनत घेतली आहे. कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळे तिने लिहिले की, ‘काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’
(Thalaivi song kangna ranaut starrer thalaivi Chali Chali Full Song Out)