बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, नेमका इतिहास काय?

या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

बहुचर्चित 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, नेमका इतिहास काय?
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 9:52 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

अर्जुन रामपालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याचा अनोखा लूक दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, लांब केस आणि हातातील शस्त्र दिसत आहे. त्यामुळे अर्जुन एखाद्या योद्ध्याप्रमाणे भासत आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना अर्जुनने Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours, असे कॅप्शन दिले आहे.

“या एका ऐतिहासिक घटनेचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे. यामुळे माझं मन हेलावून गेलं आहे. त्यामुळे तुमचेही मन हेलावून जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे येत्या 2021 ला #TheBattleofBhimaKoregaon सज्ज व्हा,” असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टरला दिले आहे.

इतिहास काय?

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष महार समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्यावेळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.

फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो.

दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं.  (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)

संबंधित बातम्या : 

सनी लिओनीचा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

‘संगीत संत तुकाराम’ नाटकाने तिसरी घंटा वाजणार, संजय नार्वेकर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारणार!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.