The Kashmir Files : ‘अशिक्षित आणि मूर्खसुद्धा असे बोलत नाहीत’ केजरीवाल यांच्या भाषणावर भडकले अनुपम खेर

सीएम केजरीवाल यांनी अनुपम खेर यांच्या 'द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) वर अतिशय परखड भाष्य केलं होतं, त्यानंतर आता अनुपम खेर यांनी (Anupam Kher) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

The Kashmir Files : 'अशिक्षित आणि मूर्खसुद्धा असे बोलत नाहीत' केजरीवाल यांच्या भाषणावर भडकले अनुपम खेर
अनुपम खेर केजरीवाल यांच्यावर भडकलेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 5:47 PM

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेलं भाषण हे अजूनही व्हायरल होत आहे. . सीएम केजरीवाल यांनी अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) वर अतिशय परखड भाष्य केलं होतं, त्यानंतर आता अनुपम खेर यांनी (Anupam Kher) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेत ‘स्टँडअप कॉमेडियन काम’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी असे हास्यास्पद बनू नये. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना अनुपम खेर म्हणाले, एकादा अशिक्षित आणि वेडपट माणूसही असे बोलत नाही. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, अनुपम खेर म्हणाले, केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे वळले पाहिजे. अशा असंवेदनशील बोलण्याला हे अचूक उत्तर आहे. ते निर्दयी आहेत, ज्या काश्मिरी हिंदूंकडून त्यांची घरे हिसकावली गेली, त्यांचा त्यांनी एकदाही विचार केला नाही. ज्या महिलांवर बलात्कार झाला, ज्यांची हत्या झाली त्यांचा विचार केला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया खेर यांनी दिली आहे.

केजरीवाल काय म्हणाले होते?

तसेच केजरीवाल यांच्या मागे उभे असलेले लोक हसत होते. हे खूप लज्जास्पद आहे. राज्याच्या विधानसभेतही हा प्रकार घडला. त्यांना राजकीय समस्या निर्माण करायच्या असतील तर भाजप किंवा पंतप्रधानांसोबत करा. पण काश्मीर फायलबद्दल असं करणं योग्य नाही, खासकरून जेव्हा लोकांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे. अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर भाष्य केले आणि ते म्हणाले की, ते दिल्लीत चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत आहेत तर यूट्यूबवर अपलोड करा. चित्रपट आपोआप विनामूल्य होईल आणि प्रत्येकजण हा चित्रपट बघेल. काश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोक कमाई करत आहेत. आणि तुम्ही त्यांचे पोस्टर चिकटवत आहात. अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

चित्रपटावरून वाद सुरूच

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय हे अर्धसत्य आहे. तर भाजप नेते यावर कौतुकाच्या फुलांचा वर्षाव करत आहेत. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रिलीज झाल्यापासून हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. चित्रपटातील स्टारकास्टच्या अभिनयापासून ते विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे.‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. त्यावरूनच हा वाद पेटलाय.

करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् Shanaya Kapoor झाली ट्रोल; पहा Video

“जेव्हा एखादा व्यक्ती मला पाकिस्तानला जायला सांगतो, तेव्हा..”; ‘बजरंगी भाईजान’च्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

Nana Patekar : नाना पाटेकर अटारी बॉर्डरवर, जवानांशी साधला संवाद, म्हणाले “तरूणांसाठी चांगली संधी…”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.