‘The Kerala Story सिनेमा नसून एक चळवळ…’, अदा शर्मा हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

| Updated on: May 17, 2023 | 5:52 PM

'विमानतळावर अनेकांना भेटते त्यांच्या डोळ्यातील पाणी...', अदा शर्मा हिच्याकडून 'द केरळ स्टोरी' सिनेमाबद्दल मोठा खुलासा... सिनेमाला मिळत असलेल्या यशानंतर अदाने केलेलं वक्तव्य चर्चेत...

The Kerala Story सिनेमा नसून एक चळवळ...,  अदा शर्मा हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई : अनेक वादांमळे अडचणीत अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा एक नवीन इतिहास रचताना दिसत आहे… सलग १२ दिवसांपासून चित्रपटगृहाबाहेर जमणारी प्रेक्षकांची गर्दी यासाठी एक उत्तम उदाहरण आहे… ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने आतापर्यंत तब्बल १५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे… सिनेमात शालिनी उन्‍नीकृष्‍णन या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे अदा गेल्या १२ दिवसांपासून सिनेमाचे दिग्दर्शत सुदीप्‍तो सेन यांच्यासोबत प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा नसून क्रांती असल्याचं सांगितलं आहे.. यावेळी अदा शर्मा हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्री म्हणली, ‘मी काही व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात दहशतवादी संघटना महिलांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करत आहेत.’

अदा शर्मा म्हणाली, ‘देशातील तरुणांना सिनेमा आवडला आहे. गेल्या आठवड्यात मी चार वेळा उड्डाण केलं… याआधी मला विमानतळावर पाहिलं की चाहते माझ्यासोबत ‘1920’ आणि ‘कमांडो’बद्दल बोलायचे. पण आता अनेक मुलींच्या आई माझ्याजवळ येतात… त्यांच्या डोळ्यात मला पाणी दिसतं… सिनेमातील माझ्या भूमिकेसाठी अनेक माता माझे आभार मानतात. केरळ स्टोरी ज्यांना आवडली… अशा असंख्य मुली मला भेटल्या…’

‘द केरळ स्टोरी सिनेमा नसून एक चळवळ आहे. माझ्यासाठी ही गोष्ट फार वेगळी आहे. कारण सत्य घटनेवर अधारित सिनेमावर मी पहिल्यांदा काम केलं आहे. शालिनी उन्नीकृष्णन उर्फ ​​फातिमा ही अशीच एक मुलगी आहे जिने कठीण परिस्थितीचा सामना केला आहे….’ सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा आहे..

हे सुद्धा वाचा

५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला प्रदर्शित होवून दोन आठवडे झाले आहेत. दोन आठवड्यात सिनेमाने बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे… सिनेमावरून सुरु असलेला वाद अद्याप शमलेला नाही…. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाबद्दल रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत.. अशात सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे…

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे… मेकर्स सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, झी नेटवर्कने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत, त्यामुळे सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होईल. निर्माते ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित करू शकतात. मात्र, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.