The Kerala Story | शबाना आझमी यांच्या ‘त्या’ वक्तव्याला कंगनाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाली…
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' वर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी चित्रपटाचे समर्थन केले आणि बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना चुकीचे म्हटलं आहे. या ट्विटनंतर आता कंगना राणौतची प्रतिक्रिया आली आहे.
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरून मोठा वादही निर्माण झाला आहे. तसंच काही ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. मात्र, या चित्रपटाला काही लोकांनी सपोर्ट केला आहे तर काहींनी सपोर्ट केलेला नाहीये. या सगळ्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी या चित्रपटाला सपोर्ट केला आहे.
शबाना आझमी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, द केरळ स्टोरीवर जे लोक बंदी घालण्याची मागणी करत आहेत ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. जेव्हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पास झाला, तेव्हा कोणालाही घटना प्राधिकरण बनण्याचा अधिकार नाही. शबाना आझमी यांच्या या ट्विटवर कंगना रनौतनं प्रतिक्रिया दिली आहे.
शबाना आझमी यांच्या ट्विटवर कंगना काय म्हणाली?
शबाना आझमींच्या या ट्विटला उत्तर देत कंगना राणौतनंही ट्विट केलं आहे. शबाना आझमीच्या ट्विटवर कंगनानं म्हटलं आहे की, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण लाल सिंह चढ्ढा या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी कोणीही केली नव्हती. प्रेक्षकांना तो चित्रपट अनेक कारणांनी बघायचा नव्हता आणि सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रपटाचा रिमेक.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय
‘द केरळ स्टोरी’ हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरी चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसंच या चित्रपटानं पहिल्या मच दिवशी य 8 कोटींहून अधिक कमाई केली होती. तर तीन दिवसांत या चित्रपटानं 35.25 कोटींची कमाई केली आहे.