लिप लॉक सीनचा रेकॉर्ड अजूनही या चित्रपटाच्या नावे, इमरान हाश्मीचा चित्रपट नव्हे,पाहा कोणता चित्रपट
हिंदी चित्रपटात चुंबन दृश्य येण्यापूर्वी कलाकार जवळ यायचे नंतर पडद्यावर दोन फुले एकमेकांना चिकटवल्याचे दाखविले जायचे. त्यामुळे प्रेक्षक समजून जायचे की आपल्या आवडत्या अभिनेत्यानं आणि आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे चुंबन घेतले आहे.
बॉलीवूडच्या चित्रपटात 20 शतकाच्या पूर्वाधात चुंबर दृश्यावर काही बंदी नव्हती. अनेक चित्रपटात मुख्य अभिनेते चुंबन दृश्य सहज देत असत. त्याकाळी कोणतेही मोरल पोलिसिंग देखील नव्हते. अगदी 1930 पर्यंत हा सिलसिला कायम होता. परंतू दुसरे महायुद्ध संपले आणि आपला देश स्वतंत्र झाला आणि सुमारे तीन दशके चुंबन दृश्य सिनेमातून हद्दपार झाले. त्यानंतर अगदी 2000 नंतर पुन्हा चित्रपटात चुंबन दृश्यांचा सिलसिला सुरु झाला. मर्डर आणि ख्वाईश सारख्या चित्रपटातून बिनधास्त चुंबन दृश्ये चित्रित केली आणि सेन्सॉरने देखील कोणतीही काटछाट न करता ही दृश्ये तशीच मंजूर केली. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर चुंबन दृश्य तर असतेच असते. परंतू या एका चित्रपटाने चुंबन दृश्याचा विक्रम मोडला गेला. कोणता तो चित्रपट पाहूयात….
3G हा हॉरर थ्रीलर चित्रपट साल 2013 रोजी रिलीज झाला होता. श्रीशांक आनंद आणि शंतनू राय चिंब्बर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि सोनल चौहाण यांनी भूमिका केली आहे. हा इरॉटिक थ्रीलर चित्रपट अगदीच छोट्या बजेटचा चित्रपट होता. तरीही अनेक प्रश्नमंजषात हा बॉलीवूडचा सर्वाधिक चुंबन दृश्ये असलेला चित्रपट म्हणून 3G या चित्रपटाचे नाव घेतले जाते. कारण त्यात तब्बल 30 लिप लॉक सीन होते. या चित्रपटाने इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या मर्डर चित्रपटाचा ( 20 किस ) रेकॉर्ड तोडून टाकला होता.
‘थ्रीजी’चा रेकॉर्ड कायम आहे
परंतू चुंबन दृश्याची भरमार असलेल्या ‘थ्रीजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर मात्र मान टाकली. या चित्रपटाला समीक्षकांनी देखील कमी रेटिंग दिले आणि आतापर्यंतचा खराब चित्रपट म्हणून त्याच्याकडे पाहीले जाते. IMDb हा साईटने देखील या चित्रपटाला 3.6 असे रेटिंग दिले होते.हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर डिझास्टर साबित होऊन त्याने वर्ल्ड वाईड 5.9 कोटी रुपयांची कमाई करीत आपल्या निर्मितीचा खर्चही वसुल केला नाही. किसिंग सीनचा 3G चा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. पण अजूनही तो शाबूत आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ त्याच वर्षी प्रदर्शित झाला यात 27 लिप लॉक किसिंग सिन होते. तर ‘बेफिक्रे’ या रणवीर सिंह आणि वाणी कपूर या चित्रपटात 25 किसिंग सीन होते.