Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई वेश्या, शाळेचं तोंडही पाहिलं नाही; नशीबाची साथ अन् बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री

अशी एक अभिनेत्री जिने मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब घडवलं.  तिची आई वेश्या व्यवसायात होती, या अभिनेत्रीने  शाळेचं तोंडही पाहिलं नाही. पण स्वत:च्या मेहनतीच्या बळावर  बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री. कोण आहे ही अभिनेत्री माहितीये? 

आई वेश्या, शाळेचं तोंडही पाहिलं नाही; नशीबाची साथ अन् बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री
The struggle of Bollywood actress and Raj Kapoor heroine Nimmi,Nawab BanoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2025 | 5:26 PM

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे खरे आयुष्य काही वेळेला आपल्या अपेक्षेपेक्षाही वेगळं दिसतं आणि धक्कादायकही असतं. काही जणांच्या कहाण्या तर चित्रपटांहूनही धक्कादायक असतात. अशीच एक अभिनेत्री जिचा लहानपण आणि संघर्षाची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा काही वेगळी नाही. पण तिने फार मेहनतीने आपलं भविष्य घडवलं. ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली.

बॉलिवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री बनली

या अभिनेत्रीने खूप लहान वयात आई गमावली, तिला शिक्षणही घेता आलं नाही. ती शाळेतही कधी गेली नाही, पण नशीबाने तिला इतकी मजबूत साथ दिली की ती थेट चित्रपटाची नायिका बनली. ही राज कपूरची अभिनेत्री बनली, बॉलिवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली. ही अभिनेत्री म्हणजे निम्मी, जिचं खरं नाव नवाब बानो होतं.

आईचे निधन अन् पुढचा अडचणींचा काळ 

नवाब बानो म्हणजेच निम्मी यांचा जन्म आग्रा येथे झाला. तिची आई वहीदान ही एक प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि गणिका म्हणजे वेश्या व्यवसायात होती. वडील अब्दुल हकीम हे सैन्यात कंत्राटदार होते. वहीदान यांचे प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान यांच्याशी चांगले संबंध होते. ती 11 वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. वडिलांनी दुसरं कुटुंब सुरू केलं होतं, त्यामुळे निम्मी तिच्या आजीबरोबर अबोटाबाद येथे राहू लागली. भारत-पाक फाळणीनंतर ती पुन्हा भारतात आली आणि मुंबईत स्थायिक झाली. तिची मावशी सितारा बेगम जी चित्रपटसृष्टीत ज्योती या नावाने प्रसिद्ध आणि तिचे पती गुलाम मुस्तफा दुर्राणी यांनी तिला आधार दिला.

The struggle of Bollywood actress and Raj Kapoor heroine Nimmi,Nawab Bano

The struggle of Bollywood actress and Raj Kapoor heroine Nimmi,Nawab Bano

राज कपूर यांच्यामुळे मिळाला पहिला ब्रेक 

मेहबूब खान यांच्या ओळखीमुळे निम्मीला ‘अंदाज’ चित्रपटाच्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. तेव्हा ती राज कपूर यांना भेटली. राज कपूर ‘बरसात’ चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत होतेच. त्यांना निम्मी इतकी आवडली की त्यांनी तिला लगेच सेकंड लीडची ऑफर दिली. तिच्या समोर नायक होते प्रेमनाथ. निम्मीने मेहबूब खान यांच्या ‘आन’ या सुपरहिट चित्रपटात काम केलं. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. त्यामुळे तिला हॉलिवूडमधून देखील ऑफर आली होती. पण त्या चित्रपटात इंटिमेट आणि किसिंग सीन होते ते तिला तिला मान्य नव्हते. त्यामुळे तिने ती संधी नाकारली.

निम्मीने बॉलिवूडला अनेक गाजलेले चित्रपट दिले

1963 मध्ये ‘मेरे मेहबूब’ चित्रपटासाठी निम्मीची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण तिने नायक राजेंद्र कुमारच्या बहिणीची दुसरी भूमिका करण्याचा हट्ट केला. दिग्दर्शकाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने तिचा हट्ट सोडला नाही. परिणामी मुख्य भूमिका साधनाला मिळाली. चित्रपट सुपरहिट झाला. त्यामुळे अभिनेत्री साधना यांची फॅनफॉलोइंग आणि प्रसिद्धी वाढली आणि निम्मी मात्र मागे पडली. कामादरम्यान तिची ओळख पटकथालेखक अली रझा यांच्याशी झाली आणि दोघांनी लग्न केलं.निम्मीने बॉलिवूडला अनेक गाजलेले चित्रपट दिले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. दरम्यान 25 मार्च 2020 रोजी, निम्मी यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं.

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.