मुंबई : बिग बॉस 17 चा आता फिनाले जवळ आलाय. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चा विजेता नेमका कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा विकेंडचा वार हा देखील पार पडलाय. मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार या दोघांपैकी एकजण बिग बॉस 17 चा विजेता होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांना एक चुक ही चांगलीच महागात पडणार असल्याचे बघायला मिळतंय. आता सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.
अनेकांचे म्हणणे आहे की, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार हे दोघेही महिलांचा अजिबातच सन्मान करत नाहीत. हेच नाही तर अभिषेक कुमार हा बिग बाॅस 17 च्या घरात देखील ईशा हिच्यासोबत भांडणामध्ये तिच्या अंगावर जाताना अनेकदा दिसला. हेच नाही तर आयशा हिने देखील मुन्नवर फारूकी याच्यावर काही गंभीर आरोप केले.
मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्याबद्दल सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. काही लोक यांचे समर्थ करताना देखील दिसत आहेत. टाॅप 2 मध्ये मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार हेच दोघे असतील आणि यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 17 चा विजेता असेल असेही सांगितले जात आहे.
Yeh press conference hi thi na? Ok!! Mujhe laga kisi ki image whitewash ki ja rahi hai #AnkitaLokahande 🤣 #VickyJain Khair Kar Bhi tho Kya Sakte hai mayke wale Jo Aae the. #PressConference Kya Shandar Questions Puche or Kya Shandar jawab Jaise Question paper pahle Mil Gya ho..…
— Manu Punjabi (@manupunjabim3) January 22, 2024
अनेकांनी थेट म्हटले आहे की, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार या दोघांचाही पत्ता कट होणार असून मनारा चोप्रा हीच बिग बाॅस 17 ची विजेता ठरेल. मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये सुरूवातीपासूनच धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. मात्र, आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून त्याचा गेम कुठेतरी खराब होताना दिसला.
दुसरीकडे अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाली. मात्र, अंकिता लोखंडे ही सतत गेमपेक्षाही अधिक पती विकी जैन याच्यासोबत अधिक भांडणे करताना दिसते. हेच नाही तर अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनाही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. आता विकी जैन हा अंकिता लोखंडे हिची माफी मागताना देखील दिसला.