Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणावत हिच्यापासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत हे कलाकार अयोध्येत दाखल, वाचा यादीच…

बाॅलिवूड कलाकार हे मोठ्या प्रमाणात अयोध्यात पोहचताना दिसत आहेत. अनेक कलाकारांची व्हिडीओ देखील पुढे आली आहेत. उद्या अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बाॅलिवूड कलाकार हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कंगना राणावत हिच्यापासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत हे कलाकार अयोध्येत दाखल, वाचा यादीच...
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 7:41 PM

मुंबई : सोमवारी अयोध्या नगरीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवू़ड कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलंय. हा संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवसच आहे. अयोध्या नगरीत याची जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. विशेष बाब म्हणजे उद्याच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवूड कलाकार हे अयोध्या नगरीत दाखल देखील झाले आहेत. आता याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

आज विवेक ओबेरॉय, मधुर भंडारकर हे काही वेळापूर्वीच अयोध्या नगरीत दाखल झाले आहेत. अनुपम खेर हे देखील अगदी थोड्यात वेळा अयोध्यामध्ये पोहचतील. अयोध्यामध्ये जाण्याच्या अगोदर अनुप खेर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

दुसरीकडे कंगना राणावत ही देखील अयोध्यामध्ये पोहचली आहे. मुंबई विमानतळावर दुपारीच कंगना राणावत ही स्पाॅट झाली. कंगना राणावत हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. कंगना राणावत हिने पोस्टमध्ये लिहिले होते की, मला नेहमीच वाटायचे की प्रभू राम लहान मुलासारखे दिसतील आणि माझी कल्पना या मूर्तीतून पुढे आलीये. अरुण योगीराज, खरोखरच तुम्ही धन्य आहात…

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विमानतळावर देखील पापाराझी यांना बोलताना कंगना राणावत ही धन्यवाद मानताना दिसली. बरेच कलाकार हे अगोदर अयोध्येमध्ये पोहचले आहेत. आज रात्रीपर्यंत जवळपास सर्वच कलाकार हे अयोध्यामध्ये दाखल होती. अमिताभ बच्चन देखील अयोध्यामध्ये जाणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. अमिताभ बच्चन यांना देखील निमंत्रण आहेय.

अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराना, विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, धनुष आणि प्रभास या कलाकारांना निमंत्रण असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार आज रात्रीपर्यंत अयोध्येत दाखल होतील.

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.