Bigg Boss 13 | कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार बिग बॉसच्या घरात?
यंदाच्या बिग बॉसच्या शूटींगचे ठिकाण, थीम, वेळ, संकल्पना सर्व काही बदलण्यात आले आहेत. दरम्यान नुकंतच बिग बॉस 13 च्या स्पर्धकांपैकी काही जणांची नावे समोर आली आहेत.
Bigg Boss 13 मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चाहते असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस (Bigg Boss). मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली अशी विविध भाषांमध्ये बिग बॉस प्रसारित होतो. हिंदी बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही हिंदी बिग बॉसचे सूत्र संचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) करणार आहे. मात्र यंदाच्या बिग बॉसच्या शूटिंगचे ठिकाण, थीम, वेळ, संकल्पना सर्व काही बदलण्यात आले आहे. दरम्यान नुकंतच बिग बॉस 13 च्या स्पर्धकांपैकी काही जणांची नावे समोर आली आहेत.
येत्या सप्टेंबरमध्ये बिग बॉसचा 13 वा सिझन सुरु होणार आहे. या सिझनमध्ये 13 स्पर्धकांपैकी 7 स्पर्धकांची नावे निश्चित झाल्याची माहिती IB टाईम्सने दिली आहे. विशेष म्हणजे या सातही स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात जाण्याचे कॉन्ट्रेक्टवरही सही केली आहे.
बॉलिवूड चित्रपट फॅशनमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसेने बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये जाण्यास होकार दर्शवला आहे. तिचा बॉयफ्रेंड राहुल देव हा बिग बॉसमध्ये होता. मात्र शांत स्वभाव असल्याने तो बिग बॉसमधून लवकर आऊट झाला. त्यानंतर आता बिग बॉस 13 मध्ये मुग्धा जाणार असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाही बिग बॉस 13 मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेत काम केले आहे. सिद्धार्थची फॅन फॉलोइंग जबरदस्त तगडी आहे. याशिवाय सिद्धार्थचे नाव अनेक वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आले आहे. रॅश ड्रायव्हींग, सह-अभिनेत्यांसोबत भांडण, मारहाण करणे यासारखे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत.
View this post on Instagram
मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा ही देखील बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. माहिकाने रामायण आणि FIR यासारखे अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी बिग बॉसच्या 12 व्या सिझनमध्ये ती जाणार असल्याचे बोललं जात होतं.
सलमान खानच्या बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये चंकी पांडे ही दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चंकी पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. साहो या चित्रपटात चंकी दिसणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कॉमेडी अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.
View this post on InstagramHappy Sunday #sundayfunday #sundaymornings #love #spreadlove #spreadpeace
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवनेही बिग बॉसच्या 13 व्या सिझनच्या कॉन्ट्रेक्टवर सही केली आहे. काही दिवसांपूर्वी जेलमध्ये गेल्यामुळे राजपाल चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागला होता. मात्र तो बिग बॉसमध्ये आल्याने त्याच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
छोट्या क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी बिग बॉस 13 मध्ये जाण्याची चर्चा आहे. मात्र या चर्चांना तिने अनेकदा नकार दिला आहे. मात्र रिपोर्टनुसार ती यंदाच्या बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे बोललं जात आहे. साथ निभाना साथिया या मालिकेनंतर देवोलीनाने कोणत्याही मोठ्या मालिकेत काम केलेले नाही. त्यामुळे ती बिग बॉस 13 मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
View this post on InstagramKi dekh rahe ho tusi? Chalo shuru ho jao oye One two, one two three four.. ?
अभिनेता आदित्य नारायण बिग बॉसमध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. मात्र आता तो पुन्हा बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून जाणार आहे. आदित्यने आतापर्यंत अनेक रिअलिटी शो मध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे आदित्यचे सलमानसोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे यंदाच्या बिग बॉस 13 मध्ये आदित्य दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.