Web Series | ‘तांडव’ ते ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरीज वर्षभरात करणार धमाका!

| Updated on: Jan 02, 2021 | 2:18 PM

2020 मध्ये बर्‍याच वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या.

Web Series | तांडव ते द फॅमिली मॅन या वेब सीरीज वर्षभरात करणार धमाका!
Follow us on

मुंबई : 2020 मध्ये बर्‍याच वेब सीरीज (web series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता यावर्षी त्या सुपरहिट वेब सीरीजचे पुढील भाग प्रदर्शित होणार आहेत ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. याशिवाय नवीन वेब सीरीज देखील धमाका करण्यासाठी तयार आहेत. या वर्षाच्या पहिल्या महिन्यात कोणकोणत्या वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत हे पहा (These web series will explode throughout the year)

तांडव
सैफ अली खानची तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये सैफ खानसोबत सुनील ग्रोवर, मोहम्मद झीशान आणि तिग्मांशू हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. अली अब्बास जफर यांनी वेब सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. ही वेब सीरीज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

जिद
जिद वेब सीरीजमध्ये अमित साध, सुशांत सिंग, अली गोनी आणि अमृता पुरी दिसणार आहेत. 22 जानेवारीला ही वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजमध्ये कारगिल युद्धातील नायक मेजर देपेन्द्रसिंग सेंगर यांच्यावर आधारित आहेत. यामध्ये सैन्याच्या मोहिमेचे वर्णन करण्यात आले आहे तसेत बरेच अॅक्शन सीन आहेत.

द फॅमिली मॅन
गेल्या वर्षी ओटीटीवर धमाल केल्यानंतर द फॅमिली मॅनचा दुसरा भाग यंदा प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरीजचे पोस्टर काही दिवसांपूर्वी शेअर केले गेले होते, परंतु अद्याप या वेब सीरीजच्या प्रदर्शिनाची तारीख समोर आली नाही. पहिल्या भागात मनोज बाजपेयी आणि शरिब हाश्मी मुख्य भूमिकेत होते. या भागातही मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत असतील.

अपहरण
एकता कपूर निर्मित अपहरण या वेब सीरीजचा दुसरा भाग यंदा रिलीज होणार आहे. या मालिकेत अरुणोदय रुद्र श्रीवास्तव आणि निधी सिंह एकत्र काम करताना दिसणार आहे.

मुंबई डायरीज 26/11
निखिल अडवाणी दिग्दर्शित मुंबई डायरीज 26/11 या वर्षी धमाका करण्यासाठी तयार आहे. ही वेब सीरिज मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांची न उलगडलेली कहाणी समोर घेऊन येत आहे. अॅमेझॉन प्राइमवर ही वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :

New Innings | चाहत खन्नाचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, विजय माल्याच्या आयुष्यावर काढणार वेबसिरीज!

Posters | ‘तांडव’मध्ये राजकारणातले मोहरे आमनेसामने, डायलॉगने वाढवली उत्सुकता!

(These web series will explode throughout the year)