2 चित्रपट फ्लॉप होताच ॲक्टिंग सोडली, आज चालवतो कोट्यवधींची कंपनी , कोण आहे तो अभिनेता ?
या अभिनेत्याचा डेब्यू चित्रपट फ्लॉप झाला होता. दुर्दैवाने त्याचा दुसरा चित्रपटही फारसा काही चालला नाही, त्यानंतर त्याने अभिनय सोडण्यातच भलाई मानली. मात्र तरीही तो आज हजारो कोटींच्या कंपनीचा मालक आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अभिनयात पदार्पण तर केलं पण करिअर फारस यशस्वी ठरलं नाही, त्यानंतर इंडस्ट्रीला अलविदा करत दुसऱ्या क्षेत्रात नशीब आजमावलं. आज आपण अशाचा एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या करिअरच्या सुरूवातीलाच दोन चित्रपट फ्लॉप झाले . आणि त्यानंतर त्याने बॉलिवूडला अलविदा करण्यातच भलाई मानली. मात्र तरीही आज तो कोट्यवधींच्या कंपनीचा मालक आहे. कोण आहे तो अभिनेता, जाणून घेऊया.
अवघ्या 27 व्या वर्षी बॉलिवूडला अलविदा करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून गिरीश कुमार तौरानी आहे. 2013 साली आलेल्या रमैया वस्तावैया या रोमँटिक चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्यासोबत श्रुति हसन प्रमुख भूमिकेत होती. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीज झाल्यावर भारतात 25 कोटी रुपयेही कमावू शकला नाही, त्यामुळे तो फ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या अपयशानंतरही गिरीश खचला नाही. तीन वर्षानंतर त्याचा लवशुदा हा दुसरा चित्रपट रिलीज झाला. नवनीत कौर ढिल्लों आणि नवीन कस्तूरिया यांचीही भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धा़कन आपटला आणि त्याच्यावर फ्लॉपचा शिक्का बसला.
लवशुदा चित्रपट रिलीज होण्याआधी काही दिवस 11 फेब्रुवारी रोजी गिरीशने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण कृष्णासोबत लग्न केले. मात्र त्याने जवळजवळ एक वर्ष आपले लग्न गुप्त ठेवले आणि फेब्रुवारी 2017 मध्ये ते उघड केले. लग्नामुळे माझ्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ नये असे मला वाटत होते असे गिरीशने नंतर नमूद केलं.
अभिनय सोडल्यानंतर उचललं मोठ पाऊल
दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने आयुष्यात मोठं पाऊल उचललं. अभिनय सोडल्यानंतर गिरीशने नी त्यांचे वडील कुमार तौरानी आणि पूर्वी टिप्स इंडस्ट्रीजचे मालक असलेले काका रमेश तौरानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. 4700 कोटी रुपयांच्या चित्रपट निर्मिती, वितरण आणि संगीत कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून आता गिरीश काम करतो. तो पुन्हा अभिनय करणार का याबद्दल सध्या काहीच अपडेट्स नाहीत.