आजवर सुंदरतेच्या अनेक व्याख्या मांडल्या गेल्या. कधी गोऱ्या रंगाला सुंदर मानलं गेलं, तर कधी रेखीव चेहऱ्याला सौंदर्य म्हटलं गेलं. आता चक्क जगातील सर्वांत सुंदर चेहरा (world’s most beautiful face) कोणाचा यावरून शास्त्रज्ञांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड (Amber Heard) हिचा चेहरा जगात सर्वांत सुंदर आहे. अँबर हर्ड गेल्या काही दिवसांपासून पूर्व पती जॉनी डेपविरोधातील (Johnny Depp) मानहानीच्या खटल्यामुळे चर्चेत होती. या खटल्यादरम्यान सोशल मीडियावर कोर्टातील तिचे बरेच व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले आहेत. वैज्ञानिकांच्या मते अँबरच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये ही जवळपास परफेक्ट आहेत. ब्रिटनमधील कॉस्मेटिक सर्जनने अँबरचे डोळे, ओठ आणि चेहऱ्याचा आकार यांचं मोजमाप आणि विश्लेषण करून निष्कर्ष काढला आहे.
युनिलॅडच्या अहवालानुसार, ब्रिटीश कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांना एका अभ्यासात असं आढळून आलंय की डिजिटल फेशियल-मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अँबरचा चेहरा अगदी 91.85% परिपूर्ण आहे. त्यांनी 2016 मधील रेड कार्पेट इमेज वापरून अँबरच्या चेहऱ्यावरील 12 पॉइंट्सचं विश्लेषण केलं. तिचे डोळे, नाक, ओठ, हनुवटी आणि डोकं यांच्यामधील मोजमाप करून जवळपास 92% गुण काढण्यात आले.
डॉ. ज्युलियन यांनी असंही सांगितलं की रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन हिच्या भुवया सर्वोत्कृष्ट आहेत. हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सनचे डोळे सर्वोत्कृष्ट आहेत आणि मॉडेल-अभिनेत्री एमिली रताजकोव्स्कीचे ओठ सर्वोत्कृष्ट आहेत. पुरुषांमध्ये अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनला 92.15% गुण मिळाले असून तो जगातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं त्यांनी म्हटलंय.
2018 मध्ये अँबरने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक मोठा लेख लिहिला होता. अँबरने त्यात कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र लेखात तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर जॉनीने अँबरविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा लेख माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि त्यामुळे माझ्या करिअरचं नुकसान होतंय, असं त्याने म्हटलं. जॉनीने 50 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. त्याचवेळी अँबरने 100 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला. याप्रकरणी कोर्टाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. जॉनी आणि अँबर 2012 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी 2015 मध्ये लग्न केलं. या दोघांचा संसार केवळ दोन वर्षंच टिकला.