हृतिक, सलमान, रणवीर.. सुपरस्टार्ससोबत काम करूनही एकही हिट नाही, कोण आहे ही अभिनेत्री ?

तिने साऊथमध्ये चिक्कार यश मिळवलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करतानाच हृतिक सारखा सुपरस्टार आणि आशुतोष गोवारीकर सारख्या नामवंत दिग्दरश्कासोबत काम केलं. सलमान, रणवीर सिंगसोबतही तिची जोडी पडद्यावर दिसली. पण गेल्या पाच वर्षांत तिे एकही हिट चित्रपट दिलेला नाही. बॅक टू बॅक फ्लॉप देऊनही ही अभिनेत्री कोट्यवधींची फी आकारते. कोण आहे ती ?

हृतिक, सलमान, रणवीर.. सुपरस्टार्ससोबत काम करूनही एकही हिट नाही, कोण आहे ही अभिनेत्री  ?
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 7:44 AM

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : साऊथमदील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करत त्यांचं नशीब आजमावलं. साऊथमध्ये तर यश मिळालंच पण बॉलिवूडमध्येही त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या अभिनयाची चर्चा आणि फॅन फॉलोईंग पहाल तर तुम्ही थक्क व्हाल. पण काही अभिनेत्री अशा असतात, ज्यांनी बॉलिवूडचा मार्ग तर पकडला, पण यशस्वी होण्यात अपयशी ठरल्या. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार होता, तिने बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली, अनेक सुपरस्टार्ससोबत कामही केलं, पण गेल्या 5 वर्षांत ती एकही हिट चित्रपट देऊ शकलेली नाही. तरीही आजदेखील ती कोट्यवधींची फी आकारते.

कोण आहे ती अभिनेत्री ?

ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत पूजा हेगडेचे नाव वरच्या नंबरला येतं. पण तिने बऱ्याच काळात एकही सुपरहिट चित्रपट दिला नाही. गेल्या काही काळापासून पूजाला मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच तिच्या चित्रपटांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. पूजा हेगडेने 2012 साली तामिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट खूप हिट झाला. नंतर तिने अनेक तेलगू सुपरहिट चित्रपटही दिले.

2016 मध्ये बॉलीवुड झाली एंट्री

त्यानंतर 4 वर्षांनी 2016 मध्ये पूजाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पदार्पणातच तिला हृतिक रोशनसारख्या सुपरस्टारसोबत मुख्य भूमिका करता आली. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘ मोहेंजोदाडो ‘ या चित्रपटातून पूजाने डेब्यू केला होता. पण, तो चित्रपट फ्लॉप ठरला, वाईट रितीने आपटला. त्यानंतर पूजाने अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 4’ चित्रपट केला. 2019 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण, हाऊसफुल 4 व्यतिरिक्त पूजाने बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही. त्यानंतर तिने रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’मध्ये तर दबंग स्टार, सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये काम केलं. पण, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत, ते फ्लॉप ठरले.

3 वर्षात एकही हिट चित्रपट नाही

‘सर्कस’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’पूर्वी पूजा हेगडे प्रभाससोबत राधे श्याम या पॅन इंडिया चित्रपटात दिसली होती. पण हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. त्या चित्रपटाने केवळ 117 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये होते, त्यामुळे हा चित्रपट खूप फ्लॉप झाला. ट्रेड रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात 130 कोटींची कमाई केली. याशिवाय पूजाने राम चरण आणि चिरंजीवीसोबत एक चित्रपटही केला मात्र तोही फ्लॉप ठरला. पूजाने तेलुगू अभिनेता थलपथी विजयसोबतही स्क्रीन शेअर केली, पण तिथेही तिचा अभिनय काही खास नव्हता.

पूजा हेगडेने गेल्या तीन वर्षांत एकही हिट चित्रपट दिलेला नाही. बॉलिवूडमध्येही तिचा एकही हिट चित्रपट नाही. रिपोर्टनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ हा पूजाचा शेवटचा चित्रपट होता, त्या चित्रपटाने जगभरात फक्त 184 कोटींची कमाई केली होती. पण बॅक टू बॅक फ्लॉप दिल्यानंतरही पूजा कोट्यवधींची फी आकारते. एका चित्रपटासाठी ती 4 कोटी रुपये घेते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.