10 वर्षात एकही चित्रपट नाही, करिअरही फ्लॉप; तरीही कमावतो कोट्यवधी… कोण आहे हा अभिनेता ?

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं पण त्यांचं करिअर काही चालू शकलं नाही. पाठीशी मोठं नाव असो किंवा नसो, टॅलेंट असल्याशिवाय इथे कोणीच तग धरू शकत नाही.

10 वर्षात एकही चित्रपट नाही, करिअरही फ्लॉप; तरीही कमावतो कोट्यवधी... कोण आहे हा अभिनेता ?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 8:46 AM

मुंबई |5 जानेवारी 2024 : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं पण त्यांचं करिअर काही चालू शकलं नाही. पाठीशी मोठं नाव असो किंवा नसो, टॅलेंट असल्याशिवाय इथे कोणीच तग धरू शकत नाही. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे उदय चोप्रा. यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा, आदित्य चोप्रा सारखा उत्तम दिग्दर्शकाचा भाऊ, असं सगळं असूनही उदय चोप्राची गाडी बॉलिवूडमध्ये फार काळ चालली नाही.

यश चोप्रांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले, यशराज सारखी त्यांची नामांकित कंपनी असूनही उदयचं करिअर फारसं चाललं नाही. गेल्या दहा वर्षांत तो काही चित्रपटात दिसलेला नाही. मात्र असं असलं तरी सध्या तो करोडो रुपये कमावतो, ते कसं काय ? चला जाणून घेऊया

मोहोब्बतें मधून शाहरुखसोबत केले पदार्पण 

खरंर उदय चोप्राचा आज 51 वा वाढदिवस आहे, 5 जानेवारी 1973 साली त्याचा जन्म झाला. यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा उदय हा धाकटा मुलगा आणि आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ. ‘मोहोब्बतें’ या रोमँटिक चित्रपटातून उदयने करिअरची सुरूवात केली. २००० साली हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर उदयने मेरे यार की शादी है, धूम, धूम २, धूम ३ यासह अनेक चित्रपटांत काम केले. हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर बरेच चालले. पण उदयच्या करिअरला त्याचा फारसा काही फादा झाला नाही.

मेरे यार की शादी है, सुपारी, चरस, निल अँड निक्की, प्यार इम्पॉसिबल, असे त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरले आणि त्याचा फटका उदयलाही बसला.

कोट्यवधींचा मालक आहे उदय चोप्रा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदयकडे ४० कोटींची संपत्ती आहे. तो आज चित्रपटांपासून दूर असला, लाईमलाइटमध्ये नसला तरी तो आलिशान आयुष्य जगतो. काही रिपोर्ट्सनुसार, तो महिन्याला ५ कोटी रुपये कमावतो. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे एकाहून एक सरस, महागड्या आणि आलिशान कार्स आहेत. तो अभिनय करत नसला तरी सध्या उदय हा यशराज फिल्म्स एंटरटेनमेंटचा सीईओ आहे. तो भाऊ, आदित्य चोप्रासोबत काम करतो आणि चांगली कमाई देखील करतो.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.