विनोद मेहरा ज्याच्यावर कधी तरी रेखानंही जीव ओवाळून टाकलेला, त्याच्याबरोबर लग्न व्हावं म्हणून रेखानं उचलेलं होतं टोकाचं पाऊल

विनोद मेहरा आज जगात नसला तरी त्याच्या चित्रपटाच्यानिमित्ताने तो अजून रसिकांच्या मनात जीवंत आहे. तो कलाकार आणि अभिनयामुळे नावाजला गेला तरी तो खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला ते त्याचे विवाह आणि त्याची अफेअर्समुळे.

विनोद मेहरा ज्याच्यावर कधी तरी रेखानंही जीव ओवाळून टाकलेला, त्याच्याबरोबर लग्न व्हावं म्हणून रेखानं उचलेलं होतं टोकाचं पाऊल
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 7:13 AM

मुंबईः विनोद मेहरा हा कलाकार म्हणजे त्याच्या चित्रपटापेक्षा तो त्याच्या अफेअर्समुळेच कायम चर्चेत राहिलेला होता. याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. पंजाबमधील अमृतसरमध्ये त्यांचा 13 फेब्रुवारी 1945 रोजी त्यांचा जन्म झालेला. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत (Film) त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. एक काळ असा होता की, त्याच्या अभिनयावर (Acting) आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर सगळी चित्रपटसृष्टी जीव ओवाळून टाकायची. त्याच्या अभिनयामुळेच 70-80 च्या दशकात विनोद मेहराच्या (Vinod Mehra) चित्रपटांची चर्चा जोरदार होती. चित्रपट कारकीर्द ऐन भरात असतानाच 30 ऑक्टोंबर 1990 मध्ये 45 वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

विनोद मेहरा आज जगात नसला तरी त्याच्या चित्रपटाच्यानिमित्ताने तो अजून रसिकांच्या मनात जीवंत आहे. तो कलाकार आणि अभिनयामुळे नावाजला गेला तरी तो खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला ते त्याचे विवाह आणि त्याची अफेअर्समुळे.विनोद मेहरा एक नाही तर तीन लग्नं केलेला होता, चौथ्या लग्नाला त्याच्या आईने त्याला परवानगी दिली नव्हती.

आईला आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न

विनोद मेहराने आपली चित्रपट कारकीर्द वयाच्या अगदी तेराव्या वर्षी म्हणजे बालकलाकार म्हणून केली होती. त्याची पहिला चित्रपट रागिनी आल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांचा ऑफर त्याला येऊ लागल्या. चित्रपटातील कामाशिवाय तो या इंडस्ट्रीत रुळला नाही, म्हणून त्याने आपल्या आईला आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्नं केलं. त्यानं पहिलं लग्न केलं ते मीना ब्रोका नावाच्या मुलीबरोबर. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर काही दिवसातच अभिनेत्री बिंदिया गोस्वामीवर त्याचं प्रेम जडलं आणि पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्याने बिंदियाबरोबर लग्न केले. बिंदिया बरोबर केलेलं लग्नंही अल्पकाळच राहिलं, तिच्या नंतर त्यानं दिग्दर्शक पी. दत्ताबरोबर संसार मांडला, आणि पी. दत्ताला सोडून त्यानं पुन्हा किरणबरोबर लग्न केले. किरणबरोबरही त्याचे संबंध जास्त दिवस चांगले राहिले नाहीत.

रेखा बरोबरच्या प्रेमसंबंधाने चर्चेत

अभिनेत्री किरणबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर विनोद मेहरा कित्येक दिवस एकटाच राहिला. तो सगळ्यात जास्त चर्चेत राहिला ते अभिनेत्री रेखा बरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे. चित्रपटसृष्टीत अशी चर्चा करतात की, विनोद मेहराने रेखा बरोबरही लग्न केले होते. त्या दोघांनी कोलकत्यात लग्न केलं होतं आणि रेखाला घेऊन तो आपल्या जन्मगावी गेला होता. रेखाबरोबर लग्न झाल्यानंतर त्याने आपल्या आईला जेव्हा तिची भेट घालून दिली तेव्हा, त्यांचे हे संबंध त्याच्या आईला पसंद पडले नाहीत. त्याच्या आईचं मत होतं की रेखा ही लग्न न झालेल्या आईची मुलगी आहे. त्यामुळे विनोज मेहराच्या आईने रेखाला साधं घरातही येऊ दिलं नव्हतं. त्यानंतरही तो घरातल्यांना काही समजावू शकला नाही, आणि रेखाबरोबरचेही संबंध तुटले. त्यांच्या प्रेमसंबंधाचे किस्से सांगताना काही कलाकार सांगतात की, अभिनेत्री रेखाने विनोद मेहराबरोबर लग्न करण्यासाठी तगादा लावला होता आणि झुरळ मारायची पावडर खाऊन तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतर सगळ्या चित्रपटसृष्टीत कितीतरी गोंधळ माजला होता.

गाजलेले आणि नावाजलेले चित्रपट

विनोद मेहराने शंभरापेक्षा जास्त चित्रपटातून काम केले होते. रागिनी, रिटा, जानी दुश्मन, नागिन, घर, स्वर्ग नरक, कर्तव्य, साजन बिना, सुहागन, एक ही रास्ता आणि खुद्दार, अनुरोध, अमरदीप, बेमिसालसारखे त्याच्या चित्रपटांनी वाहवा मिळवली होती.

विनोज मेहराने रेखा बरोबर लग्न केले असले तरी ते जास्त दिवस टिकले नव्हते. मात्र अभिनेत्री किरण बरोबर विवाह झाल्यानंतर त्यांना दोन मुले झाली ती रोहन आणि सोनिया. ही दोघंही आज चित्रपटसृष्टीत काम करत आहेत.

संबंधित बातम्या

‘इंडियन आयडल मराठी’कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली, लतादिदींच्या अजरामर गीतांचा नजराणा

अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘सिंगल’मधून हास्याचा धमाका करणार

Mitali Mayekar: हवा में उडता जायें… पांढरा शुभ्र लेहेंगा अन् निखळ हास्य; मिताली मयेकरचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज पाहिला का?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.