Mirzapur 2 | ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर पाहून प्रेक्षक नाराज, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा नारा!

‘मिर्झापूर 2’च्या ट्रेलर प्रदर्शनानंतर या वेब सीरीजला ‘बॉयकॉट’ (Boycott Mirzapur) करण्याची मागणी सुरू झाली आहे

Mirzapur 2 | ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर पाहून प्रेक्षक नाराज, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’चा नारा!
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 1:20 PM

मुंबई : सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियावर (Social Media) ‘बॉयकॉट’चे वारे वाहत आहेत. प्रेक्षक कुठला राग, कुठे व्यक्त करतील याचा अंदाज लावणे देखील कठीण झाले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही’ वाद सुरू आहे. याचा फटका आतापर्यंत अनेक चित्रपटांना बसला आहे. ‘सडक 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर सर्वाधिक नापसंती मिळवणारा व्हिडीओ ठरला आहे. त्यातच आता ‘मिर्झापूर 2’च्या ट्रेलर प्रदर्शनानंतर या वेब सीरीजला ‘बॉयकॉट’ (Boycott Mirzapur) करण्याची मागणी सुरू झाली आहे (Trending boycott Mizapur 2 on social media after trailer launched).

‘मिर्झापूर 1’ सुपरडुपर हिट ठरल्यानंतर प्रेक्षक ‘मिर्झापूर 2’ची आतुरतेने वाट बघत होते. काल (6 ऑक्टोबर) या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर सोशल मीडियावरून (Social Media) प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला 24 तास उलटत नाहीत. तोच प्रेक्षकांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी (Boycott Mirzapur) करण्यास सुरुवात केली आहे. ‘बॉयकॉट’च्या मागणीला कारणीभूत ठरले आहेत वेबसिरीजचे अभिनेते अली फजल आणि फरहान अख्तर!

का उफाळला प्रेक्षकांचा राग?

एकीकडे प्रेक्षक ‘मिर्झापूर 2’ आतुरतेने वात बघत होते, तर दुसरीकडे ट्रेलर प्रदर्शनानंतर सुरू झालेला हा ट्रेंड पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वेब सीरीजमध्ये अभिनेता अली फझल ‘गुड्डू’ची भूमिका साकारत आहे. CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा दिल्याने अली फजलवर प्रेक्षक चिडले होते. तर, दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीची बाजू घेणाऱ्या फरहान अख्तरवर देखील प्रेक्षक चिडलेले आहेत. ‘मिर्झापूर 2’ ही वेब सीरीज फरहान अख्तरच्या प्रोडक्शनमध्ये तयार झाली आहे. (Trending boycott Mizapur 2 on social media after trailer launched)

यामुळेच प्रेक्षक ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. तर, ‘बॉयकॉट’ म्हणत त्यांनी याप्रकरणावर मीम्स बनवायला देखील सुरुवात केली आहे. वेगवेगळे मीम्स बनवून प्रेक्षक आपला राग व्यक्त करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.