वयाच्या 20 व्या वर्षी Tunisha Sharma होती कोट्यवधींची मालकीण
प्रसिद्धी, संपत्ती, कुटुंब सर्व काही असताना तुनिशाने का घेतला आत्महत्येचा निर्णय; अभिनेत्री होती इतक्या कोटींची मालकीण
tunisha sharma net worth : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्री आत्महत्या केल्यामुळे टीव्ही विश्वातच नाही, तर सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने का आत्महत्या केली यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तुनिशाने बॉयफ्रेंड शीजन खानच्या मेकअप रुममध्ये गळफास लावून अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
वयाच्या 20 व्या वर्षी तुनिशाने अखेरचा श्वास घेतला. पण तिने फार कमी कालावधीत टीव्ही विश्वात आणि चाहत्यांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. प्रसिद्धी, संपत्ती, कुटुंब सर्व काही असताना तुनिशाने आत्महत्येचा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
मन विचलित करणारी गोष्ट म्हणजे 4 जानेवारीला तुनिशा 21 वा वाढदिवस साजरा करणार होती. पण वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने आयुष्य संपवल्यामुळे कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तुनिशाच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही.
पण तुनिशाच्या वडिलांचं निधन झालं आहे. तिची आई, भाऊ आणि बहिण चंदीगड याठिकाणी राहतात. अभिनेत्रीच्या आईने आत्महत्येनंतर केलेल्या आरोपांनंतर शीजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महत्ताचं म्हणजे आता चौकशीसाठी शीजानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुनिशाला डान्स आणि अभिनयाची प्रचंड आवड होती आणि महत्त्वाचं म्हणजे आवडत्या क्षेत्रात अभिनेत्रीने नाव देखील कमावलं. पण अचानक असं काय झालं ज्यामुळे तुनिशा सर्व काही सोडून निघून गेली. तुनिशा कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
तुनिशाने बालकलाकार म्हणून अभिनयाचा प्रवास सुरु केला. ‘भारत का वीर पूत्र-महाराणा प्रताप’ मालिकेतून तुनिशाने अभिनयास सुरुवात केली. आतापर्यंत तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. रिपोर्टनुसार तुनिशाकडे आता जवळपास 2 मिलियन डॉलर म्हणजे 15 कोटी रुपये आहे.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.