Tunisha Sharma आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड शीजान खानला पोलीस कोठडी

तुनिशा आत्महत्येनंतर बॉयफ्रेंड शीजान खानच्या अडचणीत वाढ; पोलीस चौकशीत विचारणार 'हे' प्रश्न

Tunisha Sharma आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड शीजान खानला पोलीस कोठडी
श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 2:46 PM

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढ्या कमी वयात अभिनेत्रीने इतका टोकाचा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बॉयफ्रेंड शीजान खानच्या (Sheezan Mohammed Khan) सोबत असलेल्या नात्यात आलेल्या वळणामुळे तुनिशा तणावाखाली होती आणि म्हणून अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं कारण समोर येत आहे. तुनिशा आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शीजान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस चौकशीत विचारणार ‘हे’ प्रश्न शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वाद झाले होते? याबाबत पोलिसांना आरोपीची चौकशी करायची आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितलं, शीजनचा मोबाईल एफएसएलकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अभिनेत्रीच्या आईने आत्महत्येनंतर केलेल्या आरोपांनंतर शीजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री शीजानला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजान चौकशीला सहयोग करत नाही. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची शीजान उलटसुलट उत्तरं देत आहे. शीजानमुळेच तुनिशाने आत्महत्या केली असल्याचा आरोप अभिनेत्रीची आई करत आहे.

हे सुद्धा वाचा

तुनिशा आणि शीजान एकमेकांना डेट करत होते. पण 15 दिवसांपूर्वी तुनिषाला कळालं की शीजान एका अन्य मुलीला देखील डेट करत आहे. यानंतर तुनिशा आणि शीजाय यांच्यात वाद सुरु झाल्याची माहिती तुनिषाच्या जवळच्या व्यक्तींनी दिली.

या घटनेमुळे तुनिषा प्रचंड तणावात होती. यामुळे अभिनेत्रीला पॅनीक अटॅक देखील आला होता. ज्यानंतर तुनिशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातच तुनिशाने शीजन करत असलेल्या फसवणुकीची माहिती कुटुंबीयांना दिली होती. असा कुटुंबीयांचा दावा आहे.

तुनिषाने बॉयफ्रेंड शीजानच्या मेकअपरूममध्ये गळफास घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता या प्रकरणी पुढे कोणतं सत्य समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.