14 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत कुशल टंडनचे जुळले सूर, प्रेमाची जाहीर कबुली ?
टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार कुशल टंडन आणि शिवांगी जोशी यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र, दोघांनीही नात्याबाबात मौन बाळगणं पसंत केलं. पण आता शिवांगी जोशीच्या वाढदिवसानिमित्त कुशल टंडनने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने शिवांगीसोबतचा स्वतःचा एक फोटोही पोस्ट केला असून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
छोट्या पडड्यावरचा प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन हा त्याच्या कामापेक्षा पर्सनल आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो, लाईमलाइटमध्ये असतो. तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी ही देखील तिच्या कामाप्रमाणेच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘बरसातें’ या मालिकेत कुशल-शिवांगीने एकत्र काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कुशल- शिवांगीच्या नाच्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या, ऑनस्क्रीन त्यांची जोडी लोकांना आवडलीच पण ऑफस्क्रीनही ते एकमेकांसोबत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण कुशल असो वा शिवांगी दोघांनीही या विषयावर स्पष्टीकरण देत या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय त्याचं कारण म्हणजे कुशलची एक पोस्ट. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्या पोस्टवरून स्पष्ट झालंय.
खरंतर शिवांगी जोशीच्या वाढदिवसानिमित्त कुशल टंडन याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत पोस्ट लिहीली. त्या कॅप्शननेच लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘हॅपी बर्थडे माय गॉर्जिअस’ असं कुशालने पोस्टमध्ये लिहीलं आहे. प्रेमळ, काळजी घेणारी आणि मजेशीर अशा विशेषणांचा वापरही त्याने केला. तुझ्यामध्ये ( शिवांगी) ते सर्व गुण आहेत जे एका मुलीमध्ये असावेत, असे लिहीत कुशलने शिवांगीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. माझ्या आयुष्यात तू आल्याने मला खूप आनंद झाला आहे. असे बरेच वाढदिवस आणि सुंदर आठवणी एकत्र तयार करूया, असेही कुशलने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय.
View this post on Instagram
चाहते झाले खुश
त्याच्या या प्रेमळ पोस्टवर शिवांगीनेही रिप्लाय करत हार्टची इमोजी दिली. कुशलच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ते दोघं एकत्र किती छान दिसतात, असंच प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यांची जोडी चाहत्यांना तर खूपच आवडली आहे. कुशलच्या या पोस्टमुळे त्याच्या आणि शिवांगीच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणण्यात येत आहे.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘बरसातें’ ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांची ही केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा झळकायची, म्हणून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं.