आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमीर खान याने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. आता त्याच्या आदर्श घेत टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता रवी दुबेसुद्धा (Ravi Dubey) सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याच्या तयारीत आहे.

आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!
रवी दुबे
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 12:03 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कलाकार आपली प्रायव्हसी कमी होत आहे, असे म्हणत आहेत. तर, सोशल मीडियामुळे त्यांचा वेळही वाया जातो आहे. अशा स्थितीत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमीर खान याने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. आता त्याच्या आदर्श घेत टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता रवी दुबेसुद्धा (Ravi Dubey) सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याच्या तयारीत आहे. रवीने आपले इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही काळासाठी तो सोशल मीडियावरून ब्रेक घेणार आहे (TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media).

ही माहिती स्वतः रवीने सोशल मीडियावर पोस्ट करतच दिली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी पुढील काही दिवस इंस्टाग्राम डिलीट करत आहे.’ ही पोस्ट वाचताच चाहते आणि त्यांचे जवळचे मित्र चकित झाले आहेत. प्रसिद्ध टीव्ही कलाकाराने हा असा निर्णय का घेतला?, हे प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे.

रवी दुबे यांची इन्स्टाग्राम पोस्ट :

पोस्टवर आल्या अशा प्रतिक्रिया

रवी दुबेसोबत जमाई राजा सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री अचंत कौर यांनी अभिनेताला ‘का?’ असा प्रश्न केला आहे. अभिनेत्री अचिंतने या मालिकेत रवीच्या सासूची भूमिका साकारली होती. रवीच्या या कठोर निर्णयामुळे त्याच्या मित्रपरिवाराव्यतिरिक्त सर्व वापरकर्तेही आश्चर्यचकित आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘का? नाही रवी!’ त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘आम्ही तुला खूप मिस करू’. त्याचप्रमाणे बर्‍याच चाहत्यांनी रडण्याचा इमोजी कमेंटमध्ये टाकून आपले दुःख व्यक्त केले आहे (TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media).

कुटुंबाला वेळ द्यायचा आहे!

रवीच्या जवळचे सूत्रांचे म्हणणे आहे की, रवीने काही काळ इंस्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे त्यांने सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्याला पत्नी आणि कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत तो सोशल मीडियावरून तात्पुरता ब्रेक घेणार आहे.

फोनवरून हटवेल अकाऊंट

रवी दुबे सोशल मीडियाला कायमचा ‘बाय’ करणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तो केवळ काही काळासाठी ब्रेक घेत आहे. तो इन्स्टाग्राम हटवू इच्छित असेल, तर ते केवळ त्याच्या फोनमधून डिलीट करेल. तो त्याचे संपूर्ण इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करणार नाही. काही दिवसांच्या कालवधीनंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर नक्की सक्रिय होईल.

(TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media)

हेही वाचा :

66th Filmfare Awards Nominations List | ‘तान्हाजी’, ‘थप्पड’, ‘पंगा’चा डंका, पुरस्कारात सुशांतलाही स्थान, पाहा संपूर्ण यादी!

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.