‘TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप

अलीकडे प्रदर्शित झालेली ‘TVF Aspirants’ प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांमध्ये ही सीरीज अधिकाधिक पसंत केली जात आहे. ही सीरीज सामान्य जीवनाशी संबंधित असल्याने तरूणांना खूप आवडली आहे.

‘TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप
TVF Aspirants
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 10:30 AM

मुंबई : अलीकडे प्रदर्शित झालेली ‘TVF Aspirants’ प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांमध्ये ही सीरीज अधिकाधिक पसंत केली जात आहे. ही सीरीज सामान्य जीवनाशी संबंधित असल्याने तरूणांना खूप आवडली आहे. रिलीज झाल्यापासून ही लोकांची वाहवा मिळवत आहे. लोकांच्या मनात घर केलेल्या या सीरीजबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे (TVF Aspirants web series in trouble write Nilotpal Mrunal claims on story).

एकीकडे ही सिरीज दणक्यात सुरू असताना दुसरीकडे लोकप्रिय हिंदी लेखक निलोत्पाल मृणाल यांनी TVF Aspirants या सीरीजवर चोरीचा आरोप लावला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

TVF Aspirantsची कथा चोरीची?

निलोत्पाल मृणाल म्हणतात की, या सीरीजमध्ये त्यांची कथा वापरली गेली आहे. यानंतर टीव्हीएफच्या Aspirants विरोधातला वापरकर्त्यांचा रोष आता सोशल मीडियावर उमटला आहे. वापरकर्त्यांनी देखील आता असे म्हटले आहे की, त्यांनी मालिकेचे श्रेय लेखकाला दिलेच पाहिजे.

डीएनएच्या वृत्तानुसार, लेखक नीलोत्पल मृणाल यांनी हिंदीमध्ये प्रदीर्घ फेसबुक पोस्ट लिहित असा दावा केला आहे की, टीव्हीएफची नवीन वेब सीरीज ‘Aspirants’ ही त्यांच्या 2015मध्ये प्रकाशित झालेल्या ‘डार्क हॉर्स’ या पुस्तकावर आधारित आहे. अरुणाभ कुमार निर्मित ही वेब सीरीज दिल्लीतील ‘राजिंदर’ नगरमध्ये राहणाऱ्या यूपीएससीच्या उमेदवारांच्या जीवनावर आधारित आहे (TVF Aspirants web series in trouble write Nilotpal Mrunal claims on story).

सीरीजच्या दिग्दर्शकावर प्रश्न चिन्ह!

इतकेच नाही तर, आपल्या पोस्टमध्ये नीलोत्पाल यांनी टीव्हीएफचे अरुणाभ कुमार यांना ते कसे भेटले, हे देखील सांगितले आणि त्यांच्या “डार्क हॉर्स” या पुस्तकावर आधारीत वेब सीरीजचा चित्रपट बनवण्याची कल्पना देखील दिली. त्यांनी ही बैठकही चांगली झाल्याचे लिहिले. इतकेच नाही, तर निलोत्पाल पुढे म्हणतात की, सैद्धांतिकदृष्ट्या Aspirantsची 30% कथा त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे, पण मुंबईत बसलेल्या लोकांसाठी हा चिंतेच विषय नवहता.

लेखक नीलोत्पल मृणाल यांना ‘डार्क हॉर्स’ या कादंबरीसाठी 2016चा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आता तो टीव्हीएफविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकेल, असे म्हटले जात. लेखकाने स्वतः ही सीरीज पाहिली आहे, जेव्हा त्याने ती पाहिली, तेव्हा या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या होत्या.

(TVF Aspirants web series in trouble write Nilotpal Mrunal claims on story)

हेही वाचा :

Video | फिटनेससाठी काहीही! वयाच्या 49व्या वर्षीही अवघड ‘हँडस्टँड’ करताना दिसली मंदिरा बेदी, पाहा व्हिडीओ…  

Love Story | हेमा मालिनीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.