Akshay Kumar चे ‘या’ अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध; ट्विंकल पतीच्या गर्लफ्रेंडला कानशिलात मारणारच होती पण…!

| Updated on: Jul 25, 2023 | 12:14 PM

दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानंतर अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय; ट्विंकल पतीच्या गर्लफ्रेंडला कानशिलात मारणारच होती पण...! सध्या सर्वत्र अक्षय कुमार याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Akshay Kumar चे या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध; ट्विंकल पतीच्या गर्लफ्रेंडला कानशिलात मारणारच होती पण...!
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींचे प्रेमसंबंध, अफेअर्स, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट झगमगत्या विश्वातील अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आज त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या अभिनेत्यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता अक्षय कुमार याचं देखील लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. सध्या अक्षय कुमार याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अक्षय याचं नाव अभिनेत्री शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, करिश्मा कपूर एवढंच नाही तर अभिनेत्री रेखा यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण यांपैकी कोणासोबत देखील अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर अक्षय याने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं.

पण लग्नानंतर देखील अक्षय याचं एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नाव जोडण्यात आहे. ज्या अभिनेत्रीसोबत अक्षय याच्या नावाची चर्चा रंगली होती, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. प्रियांका आणि अक्षय यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. ज्यामुळे दोघांमध्ये घट्ट नातं देखील तयार झालं.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, काही दिवसांनंतर बॉलिवूडमध्ये प्रियांका आणि अक्षय यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. ‘ऐतराज’ (Aitraaz), मुझसे शादी करोगी (Mujhse Shaadi Karoge) आणि ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ यांसारख्या पाच सिनेमांमध्ये प्रियांका आणि अक्षय यांनी एकत्र काम केलं.

प्रेक्षकांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. रिपोर्टनुसार, ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ सिनेमा दरम्यान प्रियांका आणि अक्षय यांच्या नात्याच्या चर्चा अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यापर्यंत येवून पोहोचल्या. प्रियांका हिच्यासोबत अक्षय याची वाढत असलेली जवळीक ट्विंकल हिला खटकत होती..

अशात एकदा ट्विंकल सिनेमाच्या सेटवर पोहोचली.. अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. सेटवर पोहोचल्यानंतर ट्विंकल आणि प्रियांका यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणामध्ये ट्विंकलने प्रियांका हिला कानशिलात मारण्याचा देखील प्रयत्न केला. पण तेव्हा अक्षय कुमार याने परिस्थिती सावरली आणि दुसऱ्या दिवशीच अभिनेत्याने प्रियांका हिच्यासोबत पुढे काम करणार नाही… अशी घोषणा केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला..