दोन राज्यांच्या पोलिसांची विधाने भारत-पाक युद्धासारखी, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची उद्विग्नता

"सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर ज्या घडामोडी घडल्या, त्या अत्यंत क्लेशदायक आहेत" असे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले

दोन राज्यांच्या पोलिसांची विधाने भारत-पाक युद्धासारखी, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची उद्विग्नता
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 10:34 AM

जळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक आहेत, दोन राज्यातील पोलिसांमध्ये सुरु असलेली विधाने भारत-पाक युद्धासारखी वाटतात, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या आहेत. (Ujjwal Nikam on Sushant Singh Rajput Death Case)

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे. दोन राज्यांचे पोलीस अशाप्रकारे विधाने करत आहेत, की जसे काही हे भारत आणि पाकिस्तानचे युद्ध आहे. अशा प्रकारच्या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

“सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी कलम 174 अन्वये चौकशी सुरु केली. या घटनेनंतर 45 दिवसांनी सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या मृत्यूबाबत काँग्निझेबल ऑफेन्सबाबत फिर्याद दाखल केली. त्यात एका अभिनेत्रीचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे” असे उज्ज्वल निकम म्हणाले.

हेही वाचा : CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश

“सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर ज्या घडामोडी घडल्या, त्या अत्यंत क्लेशदायक आहेत. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले. या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे” अशी उद्विग्नता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना 3 दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Ujjwal Nikam on Sushant Singh Rajput Death Case)

सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचं म्हणत महाराष्ट्र सरकारला सुनावलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतच्या कुटुंबियांच्या मागणीवरुन याप्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांऐवजी CBI मार्फत करावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राने ही मागणी मान्य केली.

संबंधित बातम्या :

“मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल

…तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

(Ujjwal Nikam on Sushant Singh Rajput Death Case)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.