Uorfi Javed | उर्फी जावेदने पुन्हा घातला अतंरगी ड्रेस, व्हिडीओ पाहून फॅन्स म्हणाले – बसमध्येही असेच…

Urfi Javed Viral Video : उर्फी जावेदचा फॅशन सेन्स हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी देसी लूकमध्ये दिसलेली उर्फी आता पुन्हा असा नवा ड्रेस घेऊन आली आहे, जो पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.

Uorfi Javed | उर्फी जावेदने पुन्हा घातला अतंरगी ड्रेस, व्हिडीओ पाहून फॅन्स म्हणाले - बसमध्येही असेच...
उर्फीचा नवा ड्रेस पाहिलात का ?Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 3:26 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : कोणी कितीही नाव ठेऊ देत पण उर्फी जावेदचा (Uorfi Javed) फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो. ती नेहमी एकाहून एक वेगळ्या, अनोख्या गोष्टींच्या मदतीने तयार केलेले ड्रेस (unique costumes) घालत असते, की कोणी ज्याचा विचारही करू शकत नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या देसी लूकने सर्वांना प्रभावित करणाऱ्या उर्फी जावेदने नुकताच एक नवीन लूक उघड केला आहे. सोशल मीडियावर तिने नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या उर्फीने यावेळेस असा व्हिडीओ शेअर केला आहे , जो पाहून सर्वण हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फीने असा अतरंगी ड्रेस परिधान केला आहे, ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा

उर्फीच्या फॅशनने सर्वांना केलं हैराण

उर्फी जावेदला सोशल मीडियावर कितीही ट्रोल केले जात असले, तरी ती तिचा अनोखा ड्रेसिंग सेन्स फ्लाँट करण्यापासून मागे हटत नाही. कोणी कौतुक करो वा टीका, तिला जे कपडे घालायचे ते तर ती घालतेच आणि त्याची पोस्टही टाकते. अलीकडेच बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेल्या उर्फीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद तिच्या बहिणीचे केस कंगव्याने विंचरताना दिसत आहे. मात्र त्याच वेळी तिला एक कल्पना सुचते आणि ती त्याच कंगव्यांपासून एक अनोखा ड्रेस बनवते. हे कंगवे एका साखळीला जोडलेले असून उर्फीने हा ड्रेसही फ्लाँट केला आहे. यासोबत तिने निऑन ग्रीन कलरची हाय हील सँडलही घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

ड्रेस पाहून चाहते हैराण, आल्या मजेशीर कमेंट्स

उर्फी जावेदचा हा अनोखा ड्रेस पाहिल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘मॅडम, आता कंगव्यावर तरी दया दाखवा’, अशी कमेंट एका युजरने केली केली. दुसऱ्या युजरने लिहिले, “मी माझा कंगवा शोधत होतो आणि तो तर तुमच्याकडे आहे”. तर ‘बसमध्ये असेच कंगवे विकणारे येतात’ अशी कमेंटही एकाने केली आहे.

मात्र काही युजर्सनी तिचे कौतुकही केले आहे. तिची फॅशन स्टाइल अनोखी आहे, असे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.