मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : उर्फी जावेद (Uorfi Javed) हे नाव सर्वांनाच माहीत आहे. चित्रविचित्र फॅशन, अतरंगी कपडे घालणारी आणि बिनधास्त बोलणारी उर्फी ही सतत चर्चेत असते. लोकांचं लक्ष वेधून घेण्याची कला तिच्याकडे आहे. मात्र बरेच वेळा ती यामुळे ट्रोलही (trolling) होत असते. लोकांची टीकाही तिला सहन करावी लागते. पण ती त्याकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र आता याच उर्फीबाबत एक मोठी बातमी समोर आली असून खुद्द उर्फीनेच याचा खुलासा केला आहे. खरंतर उर्फी जावेद हिला धमकी मिळाली आहे. हो तिला जीवे मारण्याची धमकी (death threat) मिळाली असून तिनेच सोशल मीडयावर याबाबत खुलासा केला आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा स्क्रीनशॉट उर्फीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर तिने ही पोस्ट केली असून ही आपल्यासाठी नेहमीचीच बाब असल्याचेही तिने यामध्ये म्हटले आहे. ‘बहुत जल्दी तेरे को गोली मार दी जाएगी, बहुत जल्दी मिशन पूरा होगा जो तूने गंदगी फैला रखी है इंडिया में वह सब गंदगी साफ हो जाएगी।’ , असा मेसेज तिला पाठवण्यात आला असून त्याचात फोटो उर्फीने शेअर केला आहे.
Regular day in my life pic.twitter.com/fHs19hLeEy
— Uorfi (@uorfi_) August 16, 2023
तिच्या या फोटोवर विविध प्रतिक्रिया आल्या असून नेटीझन्स उर्फीला सपोर्ट करण्यासाठी पुढे सरसावले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘मुली, तू घाबरू नकोस पण त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी लागेल.’ “त्यांना भुंकू दे, तू खरी धाडसी मुलगी आहेस जिला मी कधीही घाबरताना पाहिले नाही, मी तुझा खूप आदर करतो म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, फक्त दुर्लक्ष करा.” अशा शब्दात दुसऱ्या युजरने उर्फीला सपोर्ट केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी उर्फी पंजाबी ड्रेसमध्ये दिसली होती, स्वातंत्र्यदिनानिमित्तचा तिचा हा लूक खूप व्हायरल झाला होता. उर्फी जावेद या पोशाखात खूपच वेगळी आणि सुंदर दिसत होती. तिचा हा लूक पाहून अनेकांना आश्चर्य वाटले पण अनेकांनी तिचे कौतुकही केले.