Uorfi Javed : माधुरीच्या लिस्टमध्ये नसल्याने उर्फीला नो एंट्री, भडकली अभिनेत्री
Uorfi Javed On GEA 2023 : ग्लोबल एक्सिलन्स अवॉर्ड्स 2023 साठी आमंत्रित केल्यानंतर, फॅशनिस्टा उर्फी जावेदचे निमंत्रण ऐन वेळेस कॅन्सल करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्रीचा राग उफाळून आला आहे.
मुंबई : बिग बॉस ओटीटीतून पुढे आलेल्या फॅशनिस्टा उर्फी जावेदने (Uorfi Javed) तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फीने आपल्या असामान्य ड्रेसिंग सेन्सने केवळ सामान्य लोकांचेच नव्हे तर स्टार्सचेही लक्ष वेधून घेतले आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक स्टार्स तिच्या आत्मविश्वासाची आणि फॅशनची प्रशंसा करतात पण काही लोकांना ती आवडत नाही. उर्फी जावेदला अनेकदा तिच्या बोल्ड आणि अतरंगी कपड्यामुळे (fashion) अपमानित व्हावे लागले आहे, तिला बरेच वेळेस ट्रोलही (trolling) करण्यात आले आहे. दरम्यान, एका अवॉर्ड फंक्शनला पहिले आमंत्रित केल्यावर नंतर तिला निमंत्रण नाकारण्यात आल्याचा खुलासा उर्फीने केला आहे.
आधी बोलावले मग सांगितले नको येऊस
काल रात्री मुंबईत GEA 2023 पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये बी-टाऊन आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स, तसेच सेलिब्रिटीही उपस्थित होते. या सदंर्भात उर्फीने तिच्या इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली की तिला, अवॉर्ड फंक्शनसाठी आमंत्रण मिळाले होते. तिथे जाण्यासाठी तिने तिचे इतर सर्व प्लॅन्स त्यांनी रद्द केले, पण नंतर शेवटच्या क्षणी उर्फीचे निमंत्रण रद्द करून तिला अवॉर्ड फंक्शनला येण्यास नकार देण्यात आला. आणि त्यासाठी माधुरी दीक्षितशी संबंधित कारण देण्यात आले.
काय होते उर्फीला न बोलावण्याचे कारण ?
उर्फीने तिच्या इंस्टा स्टोरीवर याबद्दल लिहिले, “या कार्यक्रमा संदर्भातील मजेदार गोष्ट – त्यांनी (इव्हेंट ऑर्गनार्स) माझ्या टीमशी संपर्क साधला, मला (इव्हेंटसाठी) आमंत्रित केले. मी ते आमंत्रण स्वीकारले, त्यासाठी माझे इतर प्लान्स कॅन्सल केला. (इव्हेंसाठी) पोशाखही निवडला. पण शेवटच्या क्षणी त्यांनी माझ्या टीमला सांगितले की आता मला निमंत्रण नाही. आम्ही कारण विचारले, तेव्हा ते म्हणाला की मी माधुरी दीक्षितच्या पाहुण्यांच्या यादीत नाही… ( I’m not on Madhuri’s guest list (काय विचित्र कारण आहे)… अरे भावा, अशा इव्हेंटमध्ये जाण्यासाठी मी काही उतावीळ झालेले नाही… पण आधी बोलावून नंतर नकार द्यायचा, हे म्हणजे…. थोडी तरी हिंमत दाखवा की… नसेल तर माझ्या कडून उधार घ्या…” अशा शब्दांत उर्फीने तिची नाराजी व्यक्त करत फटकारले आहे.