Uorfi Javed च्या अतरंगी अंदाजाने नेटकरी पुन्हा हैराण, गवताचा ड्रेस पाहून लोकांनीही विचारले अजब प्रश्न..

Uorfi Javed : उर्फी जावेदने पुन्हा चित्र-विचित्र ड्रेस घालून नेटकऱ्यांना हैराण केले आहे. सोशल मीडियावर तिचा नवा व्हिडीओ पाहून लोकही अचंबित झाले आहेत.

Uorfi Javed च्या अतरंगी अंदाजाने नेटकरी पुन्हा हैराण, गवताचा ड्रेस पाहून लोकांनीही विचारले अजब प्रश्न..
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 4:41 PM

Uorfi Javed New Look : सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या चित्र-विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी लोकप्रिय आहे. तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही ती लाईमलाइटमध्ये असते. त्याचसोबत अतरंगी ड्रेसेस घालून ती नेहमीच चर्चेत येते. बऱ्याच वेळेस तिला त्यासाठी ट्रोलही (trolling) केले जाते, पण त्यामुळे तिला काहीच फरक पडत नाही.

आऊटफिट्सबद्दल नवनवे प्रयोग करताना ती मागेपुढे पहात नाही. त्यातच आता उर्फीचा एक नवा लूक खूप व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी तिने असा ड्रेस घालून अंग झाकले आहे, जे पाहून नेटकरीही भलतेच हैराण झाले आहेत.

गवताच्या ड्रेसने घातले शरीर

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती वाळलेलं गवत, झुडुपं आणि पानांपासून बनवलेला ड्रेस घालताना दिसत आहे. उर्फीचा हा ड्रेस कसा बनला, त्याची तयारीही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. तो व्हिडीओ शेअर करतानाच उर्फीने एक कॅप्शनही लिहीली आहे. “मला नेहमीच नील रणौतसोबत काम करायचे होते. त्याचा आत्मविश्वास पुढच्या स्तरावर आहे ! पैसे किंवा साधनं हातात नसतानाही त्याने गावात जे काही उपलब्ध होते त्यातून कपडे बनवले. अबू जानी आणि संदीप खोसला यांनी त्याला (नीलला) इन्स्टाग्राम रील्सवरून शोधून काढलं आणि जॉब ऑफर दिली. आता तो (नील) देशातील सर्वात मोठ्या डिझायनर्ससाठी काम करत आहे. अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या दयाळूपणाने मी दररोज आश्चर्यचकित होते.” असेही उर्फीने नमूद केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi Javed (@urf7i)

त्या ड्रेसमुळे ट्रोल झाली उर्फी

गवतापासून बनवलेला हा ड्रेस घालून उर्फीने खूप पोझ दिल्या पण तिचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केली. ‘तुमच्यासारखे नमूने कुठून येतात ?’ अशी टीका एका युजरने केली तर ‘ दीदी, पुदिना कितीला दिला ? ‘ असा उपहासात्मक प्रश्न एकाने तिला विचारला आहे. ‘ आता फक्त झिंगा लाला हू , असं करणंच बाकी आहे ‘ अशी टीकाही एकाने केली आहे. उर्फीच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

असा तयार झाला उर्फीचा नवा ड्रेस 

उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हा ड्रेस कसा तयार झाला ते दाखवण्यात आले आहे. डिझायनर नीलने हा युनिक ड्रेस तयार केला आहे. असा अतरंगी ड्रेस घालण्याची उर्फीची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने असे अनेक चित्र-विचित्र कपडे घातले आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.