उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक ? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चा सुरू

बोल्ड कपडे घातल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस उर्फीला ताब्यात घेताना दिसत आहेत.

उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक ? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चा सुरू
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 10:56 AM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते, पण त्यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे, ज्यामध्ये पोलिस तिला ताब्यात घेताना दिसत आहेत.

पोलिसांनी घेतले उर्फीला ताब्यात

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमध्ये दिसत आहे. तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिस पोहोचल्या आणि त्यांनी उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं. पण हे काय आहे, अस का करताय, असा प्रश्न उर्फीने त्यांना विचारला. छोटे कपडे घातल्याचे कारण सांगत त्या महिला पोलिसांनी तिला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. मात्र ही माझी मर्जी आहे, मी मला पाहिजे ते कपडे घालू शकते असं सांगत उर्फी तिचा बचाव करताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

तुला जे बोलायचं आहे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बोल, असं सांगत त्या दोन्ही महिला पोलिस तिला एका काळ्या कारमध्ये बसवतात आणि ते सर्व निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तिचा हा व्हिडीो पाहून उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर काही सोशल मीडिया युजर्स तर पोलिसांसोबत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी उर्फीच्या कपड्यांबद्दल आक्षेप नोंदवत तिला तुरूंगात डांबले पाहिजे अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींना पोलिसांची ही कारवाई योग्य वाटलीय

ड्रामा की खरीखुरी अटक ?

सध्या एकीकडे उर्फीच्या अटकेची बातमी सर्वत्र पसरली आहे. तर हे फक्त नाटक आहे अशा कमेंट्स सोशल मीडियावर अनेक जण करत आहेत. युजर्सना हा उर्फीचा नवीन ड्रामा वाटत आहे. त्या पोलिसही बनावट आहेत, असेही अनेकांचं म्हणणं आहे. ज्या कारमधून त्यांना नेण्यात आले ती गाडी पोलिसांची नाही, असेही काही जणांनी लिहीलं आहे. पण आता या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.

छोटा पंडित बनणं उर्फी जावेदला पडलं महागात

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. खरंतर हॅलोवीन पार्टीसाठी तिने बॉलिवूड चित्रपटातील एका भूमिकेसारखा वेश केला होता. ही भूमिका होती ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील छोटा पंडितची. अभिनेता राजपाल यादवने ही भूमिका साकारली होती. तसाच लूक उर्फीने केला. मात्र तो लूक तिला फार महागात पडला.

उर्फीने  एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये ती ‘भुलभुलैय्या’मधील राजपाल यादवने साकारलेल्या ‘छोटा पंडित’च्या लूकमध्ये दिसली होती. चेहऱ्यावर भगवा रंग, भगवी धोची आणि कानावर लावलेली अगरबत्ती.. असा हा तिचा लूक होता. या लूकमुळे उर्फीला सोशल मीडियाद्वारे धमकीचे मेसेज येऊ लागले आहेत. याबद्दलची माहिती तिने मुंबई पोलिसांना दिली.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.