Urfi Javed टॅक्सी ड्रायव्हरवर भडकली, ही जेवणासाठी खाली उतरली, तो सामान घेऊन पळाला, हिनं पकडून आणलाच पण…!
Urfi Javed Instagram उर्फी जावेदने कॅब ड्रायव्हरची तक्रार सोशल मीडियावर केली आहे. कॅब ड्रायव्हर सर्व्हिसला टॅग करत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
Urfi Javed news : विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर तुफ्फान चर्चेत असलेली उर्फी जावेदच्या (Urfi Javed Video) बाबतीत एक संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे उर्फी जावेद सदर व्यक्तीवर खूप भडकली अन् थेट सोशल मीडियावर त्या व्यक्तीच्या फोटोसह तिने पोस्ट टाकली. उर्फी जावेदने एका कॅब ड्रायव्हर सर्विस कंपनीला या वादात ओढलंय. उर्फी जावेदने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलंय, ती दिल्लीला आली होती. तिथे तिने अॅपद्वारे कॅब बुक केली. मात्र तिचा अनुभव अत्यंत वाईट होता. कारण हा टॅक्सी ड्रायव्हर तिचं सामान घेऊन फरार झाला. अखेर एका मित्राच्या मदतीने तिने त्याला शोधलं. ड्रायव्हर तर आला पण तोही दारूच्या नशेत धुंद होता…
उर्फी जावेदचं सामान घेऊन पळाला…
उर्फी जावेदने सोशल मीडियावर या ड्रायव्हर विरोधात तक्रार केली आहे. तिने लिहिलंय- या कॅब ड्रायव्हरसोबत मला वाईट अनुभव आलाय. मी दिल्लीत होते. सहा तासांसाठी टॅक्सी बुक केली होती. विमानतळाकडे जाताना मी लंचसाठी गाडी थांबवली. खाली उतरले. तर हा टॅक्सी ड्रायव्हर सामान घेऊन पळून गेला. कसं बसं मित्राच्या मदतीने ड्रायव्हरला परत बोलावलं तर तो दारूच्या नेशत धुंद होता.
उर्फी भडकली..
उर्फी जावेदने ट्विटर, इन्स्टाग्रामवर कॅब कंपनीला टॅग करत या चालकाची तक्रार केली. उर्फीने इंस्टाग्रामवर लिहिलंय. महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर माझा टॅक्सी चालकासोबतचा अनुभव अत्यंत वाईट आहे. आधी त्याने माझं सामान चोरून निघून गेला आणि परत आला तर दारुच्या नशेत..
Had the worst experience with @UberINSupport @Uber in delhi,booked a cab for 6 hours,on my way to airport stopped to have lunch, the driver vanished with my luggage in the car. After interference from my male friend the driver came back completely drunk after 1 hour @Uber_India pic.twitter.com/KhaT05rsMQ
— Uorfi (@uorfi_) February 21, 2023
कंपनीकडून माफी
उर्फी जावेदने सोशल मीडियावर टॅक्सी कंपनीला चालकाची तक्रार केली. त्यानंतर कंपनीकडून रिप्लायदेखील आला आहे.कंपनीने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे .