बर्थडेला केकसाठी पैसे नव्हते म्हणून रसमलई कापून…; परिणितीची संघर्ष कथा ऐकून नेटकरी हैराण
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कठीण काळातील काही आठवणी सांगितल्या आहेत. त्या ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायम चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी सिनेमांमुळे. काही दिवसांपूर्वी परिणितीचा ‘चमकीला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर परिणिती रुपेरी पडद्यापासून लांब आहे. परिणिती तिच्या सिनेमामुळे चर्चेत नसली तरी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या आयुष्याती कठीण काळाविषयी सांगितले आहे. ते ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. आता परिणिती नेमकं काय म्हणाली. चला जाणून घेऊया….
परिणितीने नुकताच मॅशेबल मिडल ईस्टशी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये परिणितीने तिच्या कुटुंबाच्या संघर्षच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. परिणितीने सांगितले होते की जेव्हा तिच्या कुटुंबाचा संघर्षाचा काळ सुरु होता तेव्हा वाढदिवशी केक कापण्याऐवजी रसमलइचा तुकडा कापत असे. हे ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. त्यांनी परिणितीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय म्हणाली?




“आम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी वडिलांकडे फार पैसे नसायचे. मी माझ्या आई-बाबांचा संघर्ष पाहिला आहे. माझ्या वाढदिवसाला केक आणण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नसायचे. माझे वडील बाजारात जाऊन एक रसगुल्ला विकत घ्यायचे, किलो नाही. फक्त एक तुकडा, एक रसगुल्ला किंवा रसमलई आणि आम्ही ती रसमलई वाढदिवसाच्या केकसारखी कापायचो” असे परिणिती म्हणाली.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
सोशल मीडियावर परिणितीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने, ‘ही खोटं बोलत आहे. यापूर्वी देखील तिला तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खोटे बोलताना पकडले होते’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने, ‘मग लंडनला शिक्षणासाठी कशी गेली? प्रियांकाची आई ही आमदाराची मुलगी आहे… सर्वसामान्यांपेक्षा ते प्रचंड श्रीमंत आहेत. परिणिती बेहेन शांत हो’ असे म्हणत परिणितीला प्रश्न विचारला आहे.