दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही किस करत राहिला; ‘त्या’ व्हिडीओमुळे वरूण धवन चांगलाच ट्रोल
वरुणने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका केल्या आहेत. पण एका चित्रपटात त्याने दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो किसींग सीन तसाच सुरु ठेवला. त्याचा हा व्हिडाओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून सध्या वरूण प्रचंड ट्रोल होताना दिसतोय.
बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से घडत असतात की ज्यांची चर्चा ही होतच असते. अनेक सेलिब्रिटी असे असतात ज्यांना आपल्या सहकलाकारांबद्दल विचित्र अनुभव आलेले आहेत. त्या सेलिब्रिटींनी त्यांचे अनुभव सर्वांसोबत शेअरही केले आहेत. असाच एक किस्सा एका प्रसिद्ध बॉलिवूड स्टार असलेल्या एका अभिनेत्याचा घडला आहे.
या अभिनेत्याने चक्क सीन कट झाल्यानंतरही अभिनेत्रीसोबत त्याचा किसींग सीन सुरुच ठेवला होता. या सिनचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. हा अभिनेता आहे वरूण धवन. अभिनेता वरुण धवन हा सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे.
वरुण धवनचा तो व्हिडीओ व्हायरल
वरुणने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका केल्या असून 2014 मध्ये त्याने ‘मैं तेरा हीरो’ नावाचा चित्रपट केला. वरूणचा हा किस्सा ‘मैं तेरा हीरो’ या चित्रपटावेळीच घडलेला आहे. वरुण धवनने या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि नरगिस फाखरी सोबत काम केले.
सध्या वरुणच्या याच चित्रपटाशी संबंधित एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वरून धवन दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही नरगिस फाखरीला किस करत राहिला. यावरून सध्या नेटकरी वरुणला ट्रोल करत आहेत.
सीन कट म्हटल्यावरही वरूण किस करत राहिला
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता वरुण धवन आणि नरगिस फाखरी हे दोघे ‘मैं तेरा हीरो’ या चित्रपटासाठी एक सीन शूट करताना दिसतायत. या रोमँटिक सीन दरम्यान वरुण अभिनेत्रीला किस करत असतो. परंतु तो या सीनमध्ये इतका गुंग होतो की दिग्दर्शकाने कट… कट… कट! म्हटल्यावरही तो अभिनेत्रीला किस करणं सुरूच ठेवतो. दरम्यान वरुण सोबत हा सीन करणारी अभिनेत्री नरगिस फाखरी आणि जवळपासचे क्रू मेंबर्स देखील हसताना दिसतात. भानावर आल्यावर वरुण अभिनेत्रीपासून दूर होतो.
वरून धवन होतोय ट्रोल
वरुणचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून यावरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “ठरक, ठरकी, ठरकुला.” तर दुसऱ्याने लिहिले, “ओवरएक्टिंगची दुकान आणि बेशरम”. तर एकाने लिहिले की, “याला बॉलिवूडमधून काढून टाका त्याने खूप नाव खराब केलं आहे”. तर एकाने लिहिले की, “याला बॅन करायला हवे” अशा पद्धतीने सर्वच त्याला ट्रोल करत आहेत.
This Creep #VarunDhawan always crosses boundaries with Actresses. Director said CUT and he is still going on🥴 eww pic.twitter.com/uHR8n4YuGV
— Asad (@KattarAaryan) January 12, 2025
नरगिसने म्हटले वरुण माझा आवडता को-स्टार
एका मुलाखतीत अभिनेत्री नरगिसने म्हटले होते की, “वरुण हा तिचा आवडता सह-कलाकार आहे. मला वाटते की मी वरुण धवनसोबत सेटवर सर्वात जास्त मजा केली. तो ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला आहे आणि खूपच मजेशीर व्यक्ती आहे.”